ऊर्जानगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:49+5:302021-06-20T04:19:49+5:30

चंद्रपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील ऊर्जानगर परिसरातील आयुषनगर ...

30 lakhs for construction of garden at Urjanagar | ऊर्जानगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लाख

ऊर्जानगर येथे उद्यान बांधकामासाठी ३० लाख

Next

चंद्रपूर : विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर तालुक्‍यातील ऊर्जानगर परिसरातील आयुषनगर येथील मोकळ्या जागेत उद्यानाचे बांधकाम करण्‍यासाठी ३० लाख रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे.

ग्रामविकास विभागाच्‍या ३१ मार्च २०२१ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये २५१५ या लेखाशीर्षांतर्गत सदर उद्यानाच्‍या बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्‍यात आला आहे. आयुषनगर परिसरातील नागरिकांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे. याआधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जानगर येथे आ. कोटी ७८ लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना, महानिर्मिती कंपनीच्‍या सीएसआर निधीच्‍या माध्‍यमातून विविध विकासकामे, जलशुद्धीकरण संयंत्र, एलईडी पथदिवे अशी विविध विकासकामे पूर्णत्‍वास आणली आहेत. आयुषनगर येथे ३० लाख रुपये निधी खर्चून उद्यान बांधकाम करण्‍याची मागणी पूर्णत्‍वास येत असल्‍यामुळे परिसरातील नागरिकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: 30 lakhs for construction of garden at Urjanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.