जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३०० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:43+5:302021-08-15T04:29:43+5:30
यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, आमदार ना.गो. गाणार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार ...
यावेळी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, आमदार ना.गो. गाणार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपायुक्त (नियोजन) थुटे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, भंडारासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी ग्रामीण रुग्णालयात ७ कोटी खर्चून फायर फायटिंग सिस्टम लावण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण व काही ठिकाणी नवीन बांधकाम करावे. प्रत्येक तालुक्यात वाचनालयासाठी जिल्हा ग्रंथपालांनी सर्व प्रस्ताव एकत्रित मंजूर करून निधीची मागणी करावी. जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सर्वसाधारण योजनेसाठी २४९.६० कोटी व आदिवासी उपाययोजनाअंतर्गत ८३.९३ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाला. एकूण मंजूर नियतव्यय ३०० कोटींचा आहे. यापैकी ३० टक्के निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर खर्च करायचा आहे. मंजूर नियतव्ययाच्या ६० टक्के निधीच्या खर्चाला मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.
बॉक्स
बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाख
बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना विकासासाठी २५ लाखांचा निधी देण्याचे नियोजन आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करावेत. वढा धार्मिक स्थळाला ब दर्जा देऊन निधी उपलब्ध करू. इतर मागास वर्गासाठी स्वतंत्र घरकुल योजना प्रस्तावित आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत व्हीजेएनटीच्या मुलांनाही प्रवेश देऊ, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.