गोंडकालीन किल्ल्यांच्या स्वच्छतेला ३०० दिवस पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:32 PM2018-01-10T23:32:48+5:302018-01-10T23:33:26+5:30
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शहरातील साडेपाचशे वर्षे प्राचीन गोंड़कालिन किल्ले व परकोटावर बऱ्याच ठिकाणी वृक्ष-वेली वाढल्या़ शिवाय, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे मूळ चेहरा विद्रूप झाला़ हा प्रकार वाढल्यास ऐतिहासिक वारसा संपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे इको-प्रो संस्थेच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत किल्ला परकोट स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले़
स्वच्छता अभियानमध्ये रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्रमदान करून शहरातील किल्ल्यांवरील उगविलेली झाडे व नागरिकांनी टाकलेला कचरा साफसफाई केली जात आहे़ आतापर्यंत अभियानात चंद्रपूर किल्ला परकोटचे ४ दरवाजे, ५ खिडक्या, ३९ बुरुजांपैकी २९ बुरूजांची स्वच्छ करण्यात आली आह़े़ किल्लाच्या भिंतीपैकी ७० टक्के भिंती व किल्ल्यावरुन पायदळ चालण्याच्या मार्गाची स्वछता करण्यात आली आहे़ किल्ल्याच्या विविध भागांची स्वच्छता झाल्यान नागरिकांना ऐतिहासिक सहल करता येऊ शकते़़ पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गोंडकालिन स्थळांना भेट देऊन इतिहास व वास्तुंची माहिती जाणून आता शक्य झाले आहे़
किल्ले परिसरातही स्वच्छता
पठाणपूरा, जटपुरा, बिनबा, अंचलेश्वर गेट, विठोबा खिडकी, हनुमान खिड़की, बगड़ खिड़की, मसन खिडकी, चोर किडकी, आंबेकर लेआऊट, शाही मशीद, कोनेरी ग्राऊंड, दादमहल, आंबेकर लेआऊट आदी परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़
सहकार्याची गरज
किल्ला परिसर आणि किल्ल्यावर घाण पसरू नये, याकरिता शहरातील प्रत्येक नागरिकाने सहकार्य केल्यास हा ऐतिहासिक हजारो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे़ त्यासाठी मोहिमेला चळवळीचे स्वरुप आणण्यास मदत करावे़
'मन की बात' मध्ये चंद्रपूर शहराची दखल
स्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले असता चंद्रपुरातील या श्रमदानाची दखल २९ आॅक्टोबर २०१७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात घेतली होती. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला़ इको-प्रो संस्थेचे सदस्य आणि चंद्रपूर शहरातील नागरिक या मोहिमेत सहभागी झाल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरला आहे़