जिल्हा परिषदचे ३१ शिक्षक दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:34 PM2018-07-27T22:34:18+5:302018-07-27T22:35:03+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतला.
Next
ठळक मुद्देबनावट प्रमाणपत्र प्रकरण : सीईओंनी बजावले नोटीस
<p>राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतला. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. २१ जुलैपासून सतत तीन दिवस वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली. दरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या आदेशानुसार सर्व पंचायत समित्यांमधील बदलीपात्र शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल ३१ शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली करून घेतल्याचे स्पष्ठ झाले आहे.
दरम्यान, खोटे प्रमाणपत्र सादर केलेल्या ३१ शिक्षकांना शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून शेवटची संधी दिली आहे. या सर्व शिक्षकांनी दोन दिवसात राज्य शासनाच्या बदली धोरणानुसार स्पष्टीकरण दिले नाही तर एक वेतनवाढ कायमची रोखली जाणार आहे. याशिवाय जे शिक्षक खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर तालुका अथवा जिल्हास्थळी बदली करून घेतली त्यांना परत त्याच ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.
‘त्या’ दोषी शिक्षकांची वेतनवाढ बंद करणार
चंद्रपूर : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने बदलीचे सुधारीत धोरण लागू केले. त्यानुसार जिल्ह्यात विशेष संवर्ग एक व दोन मध्ये आॅनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे होते. या दोन्ही संवर्गात बनावट प्रमाणपत्र सादर करून राज्य शासनाची फसवणूक केली. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभागाने तब्बल ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली. गटशिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
बदली करून घेतलेल्या शिक्षकांकडून प्रमाणपत्र व संबंधीत कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ३१ शिक्षक दोषी आढळले. या शिक्षकांना अखेरची संधी म्हणून स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस सीईओंनी शुक्रवारी जारी केले. बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर बदली करून घेणाºया तालुक्यामध्ये भद्रावती, चंद्रपूर, वरोरा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभुर्णा आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे यानंतरच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रकरणात या दोषी शिक्षकांना सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर करणार आहेत.
१३ बदली प्रकरणे न्यायप्रविष्ठ
जिल्हा परिषदेतील १३ शिक्षकांनी बदली प्रकरणामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली. शासनाच्या धोरणांना ठेंगा दाखवून बदली करून घेतल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र या शिक्षकांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे.
दोषी आढळलेले तालुकानिहाय शिक्षक
खोटे प्रमाणपत्र सादर करणाºयांमध्ये चंद्रपूर, राजुरा व भद्रावती तालुक्यातील प्रत्येकी ४, वरोरा ५, ब्रह्मपुरी ६, सिंदेवाही व सावली तालुक्यात प्रत्येकी ३, मूल व पोंभुर्णा तालुक्यातील प्रत्येकी एका अशा ३१ शिक्षकांचा समावेश आहे. विद्याज्ञानाचे पवित्र कार्य करणाºया शिक्षकांनीच बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ठ झाल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
३१ शिक्षकांना शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली. तपासणीदरम्यान या शिक्षकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. नियमानुसार कारवाई करण्यापुर्वी संबंधित शिक्षकांना स्पष्टीकरणासाठी एक संधी देण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास कारवाई होईल.
- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रपूर.