३२ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आज शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:57 PM2019-01-04T22:57:34+5:302019-01-04T22:57:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे १३८०.८४ लक्ष रुपयांचे स्वतंत्र व प्रादेशिक पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे १३८०.८४ लक्ष रुपयांचे स्वतंत्र व प्रादेशिक पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंजूर झाल्या असून त्या सुरु करण्यात येणार आहेत. या योजनांचा ई-भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
जिल्हयातील ३२ गावांमध्ये या योजना मंजूर झाल्या आहेत. बेलसणी, म्हातारदेवी, अडेगाव, पांढरकवडा, चोरगाव, मारडा, मांगली, चांदगाव, कळमगाव, खातोडा, मिनझरी, पिटीचुआ, बेलगाव, उसेगाव, निमगाव, चक घोसरी, तांबेगडीमेंढा, चिटकी, नवेगाव चक, नवेगाव टोला, पुनागुडा, चिखली, कातलाबोडी रामपूर, चिंचोली, कळमणा, बिजोणी, कढोली, पांझुर्णी , निलजई, शेंबळ आदी गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले असून येथे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पांढरकवडा या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.