मनपा निवडणुकीसाठी ३.२ लाख मतदार

By admin | Published: March 10, 2017 01:55 AM2017-03-10T01:55:42+5:302017-03-10T01:55:42+5:30

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ लाख २ हजार ५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

3.2 lakh voters for the NMC elections | मनपा निवडणुकीसाठी ३.२ लाख मतदार

मनपा निवडणुकीसाठी ३.२ लाख मतदार

Next

संजय काकडे : १८ मार्चपर्यंत स्वीकारणार आक्षेप
चंद्रपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ३ लाख २ हजार ५७ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यावर १८ मार्चपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहे. आक्षेपांची सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे आयुक्त संजय काकडे यांनी गुरूवारी दिली. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी अंतिम मतदार यादीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त काकडे यांनी सांगितले की, प्रारूप मतदार यादी १४ मार्च रोजी प्रकाशित केली जाणार आहे. १८ मार्चपर्यंत आक्षेप आल्यानंतर अंतिम यादी २२ मार्चला प्रकाशित केली जाणार आहे. प्रारूप मतदार यादी ‘ट्रू व्होटर’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्या अ‍ॅपच्या माध्यमातूनच मतदारांना आपले आक्षेप नोंदवायचे आहेत. त्याकरिता दुसऱ्यांची मदत घेतली जाऊ शकते. तसेच मनपामध्ये मतदारांकरिता ‘मदत पथक’ तयार करण्यात आले आहे. या निवडणुकीत उमेदवारांना आपला निवडणूक खर्च ‘ट्रू व्होटर’ या अ‍ॅपच्या माध्यमातूनच सादर करायचा आहे. त्यावर कोणताही आक्षेप स्वीकारल्या जाणार नसल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले.
ही मनपा निवडणूक ५ जानेवारीपर्यंत नोंदविण्यात आलेल्या यादीच्या निकषावर घेण्यात येत आहे. यावेळी मतदारांची एकूण संंख्या ३ लाख २ हजार ३५९ होती. त्यातून ३०२ मतदारांची नावे काढण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ३ लाख २ हजार ५७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. गेल्या २०१२च्या निवडणुकीत २ लाख ३६ हजार ९९५ मतदार होते. त्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ७५ हजार मतदारांची वाढ झाली आहे. निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यानी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: 3.2 lakh voters for the NMC elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.