३४ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:35 AM2021-02-25T04:35:57+5:302021-02-25T04:35:57+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. ...
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ३४ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १०, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर एक, भद्रावती नऊ, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर व वरोरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बॉक्स
मास्क न वापरणाऱ्यांकडून दहा लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, शारीरिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नागरिकांवर प्रशासनाने कारवाई सुरू आहे. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ तीन दिवसात एक हजार ३३७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियम न पाळणाऱ्या २० आस्थापनांवर ३९ हजारांचा दंड ठोठावला तर मास्क न वापरल्याने ४ हजार ६२५ जणांकडून ९ लाख ८६ हजार ५४० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिली.