३४ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांचे मनोमिलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:27 PM2018-02-22T23:27:30+5:302018-02-22T23:27:53+5:30
येथील सीटी हायस्कूलमधून ३४ वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करिअर घडविणाºया माजी विद्यार्थ्यांचा दाताळा मार्गावरील एका लॉनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील सीटी हायस्कूलमधून ३४ वर्षांपूर्वी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात करिअर घडविणाºया माजी विद्यार्थ्यांचा दाताळा मार्गावरील एका लॉनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला.
चंद्रपुरातील सीटी कॉन्व्हेंट व सीटी हायस्कूलमधून १९७२ ते १९८४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेली ही पिढी करिअर घडविण्यासाठी विविध क्षेत्रांची निवड केली. अनेकांनी त्या-त्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला. दरम्यान, केवळ प्रपंच, नोकरी, व्यवसायातच गुंतून राहिल्याने एकमेकांशी संवाद तुटला होता. हे तुटलेपण पुन्हा साधण्यासाठी नव्या संवाद माध्यमांचा आधार घेण्यात आला. यातून हे माजी विद्यार्थी एकत्र आलेत. रविवारी येथे स्रेहमिलन सोहळा घेवून
जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, लहानाचे मोठे झालो. त्याच शाळेतील मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने आनंदाला उधाण आले होते. मेळाव्याप्रसंगी कॉन्व्हेंटच्या निवृत्त प्राचार्य ज्योती धोटेकर, सीटी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक एच. एन. जांभुळे यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्याला मुंबई, पुणे, नाशिक, भिलाई, नागपूर शहरातून माजी विद्यार्थी आले होते. त्यामध्ये अधिकारी, अभियंता, प्राचार्य, शिक्षक, उद्योजक, राजकारणी, पत्रकार, गृहिणी आदींचा समावेश होता. मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादर केले. वैशाली जांभुळे, किरण उपगन्लावार, सानिका ठाकरे, विजय बोनगीरवार, ज्ञानचंद गावंडे, चारुशीला मून, लता चिमूरकर यांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. विविध सत्रांचे संचालन दिनेश मेश्राम, कैलाश मोदी, सुधीर ठाकरे, संजय तायडे यांनी केले.
यावेळी विवेक आबोजवार, व्यंकटेश उपगन्लावार, मकरंद घरोटे, संदीप मामीडवार, गिरीधर मेश्राम, प्रताप शिंदे, अतुल शिवणीवार, श्याम राजूरकर, अतुल रायकुंडलिया, गिरीश कोंतमवार, सुधीर माजरे, अविनाश रेशीमवाले, राजेश गुजरकर, संजय ठाकरे, आशिष पुराणिक, अनिता भोसले, संगीता दलाल, वंदना तोमर, अलका सिंघवी, ममता तोमर, अरुणा चुडासमा, जया साळवे, अर्चना इंगळे, कल्पना सिद्धमशेट्टीवार, किरण कुलटे, प्रवीणा मेश्राम, शोभना मेश्राम, उज्ज्वला इथापे, तनुजा रामटेके, भावना पतरंगे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.