विद्यार्थ्यांसाठी सजणार 342 वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:00 AM2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:27+5:30

शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते. हा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरु केले आहे.

342 classrooms to be decorated for students | विद्यार्थ्यांसाठी सजणार 342 वर्गखोल्या

विद्यार्थ्यांसाठी सजणार 342 वर्गखोल्या

Next
ठळक मुद्देज्ञानकक्षा रुंदावणार : बाला पेंटींगच्या माध्यमातून होणार शाळांची रंगरंगोटी

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील सव्वा वर्षापासून शाळा बंद आहे. परिणामी विद्यार्थी आता घरात रमले असून ते शाळा, अभ्यास यापासून बरेच दूर गेले आहे. दरम्यान आता चालू सत्रापासून शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेत ते कंटाळू नये, शाळेबद्दल प्रमे वाटावे, शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी सोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ३४२ वर्गखोल्यांची बाला पेंटींग अंतर्गत रंगरंगोटी करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३४२ वर्गखोल्यांची निवड करण्यात आली असून यासाठी १ कोटी २ लाख ६० हजार रुपये खर्च केले जाणार आहे.
शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते. हा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरु केले आहे. या अंतर्गत त्यांनी वर्ग खोल्यांची बाला पेंटीग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत सन २०१७-१८ पासून तर २०१९-२० पर्यंत ज्या गावांतील शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या खोल्यांना बाला पेंटींग अंतर्गत निधीची तरदूत नव्हती, अशा ३४२ वर्गखोल्यांची बाला पेंटींग अंतर्गत निवड करण्यात आली असून शैक्षणिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी १ कोटी २ लाख ६० हजार रुपये मंजुर केले आहे. या कामाला सुरुवातही झाली असून शैक्षणिक सत्र सुरु होतपर्यंत या वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या सज्ज होणार असून विद्यार्थ्यांना खुनावणार आहे. 

असा आहे उद्देश
- शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
- आनंददायी शिक्षण
- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी
- कल्पना शक्तीचा विकास
- इयत्तेनुसार अध्यपन क्षमता विकास

१० वर्ष टिकेल अशी करावी लागणार गुणवत्ता
वर्गखोल्यांची पेंटिंग करताना किमान १० वर्ष टिकतील अशा प्रकारची गणवत्ता असणे गरजेचे असून यासाठी गुणवत्तेचे पेंट, ऑईल पेंट वापरून आतील आणि बाहेरील भागाची पेंटींग करावी लागणार आहे.

१ कोटी २ लाख ६० हजार होणार खर्च
जिल्ह्यातील ३४२ वर्ग खोल्यांच्या पेंटीगसाठी १ कोटी २ लाख ४० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. या खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पेंटींगचे कामही सुरु झाले आहे. दरम्यान, आणखी दोनशेच्या वर शाळांना पेंटीगसाठी निधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आह.

 

Web Title: 342 classrooms to be decorated for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.