३५५ कोरोनामुक्त तर १४८ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:36+5:302021-06-03T04:20:36+5:30
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ५१ वर पोहोचली. सुरूवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७९ हजार ४७१ झाली आहे. ...
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८३ हजार ५१ वर पोहोचली. सुरूवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७९ हजार ४७१ झाली आहे. सध्या २ हजार २१५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ७६ हजार २४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ९० हजार ५४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज एकूण २,६१५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४८ पॉझिटिव्ह तर २ हजार ४६७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १,४६५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १,३५७, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ५०, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरात आढळले फक्त १८ रूग्ण
बाधित आलेल्या १४८ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रात १८, चंद्रपूर तालुका १७, बल्लारपूर ३३, भद्रावती १३, ब्रह्मपुरी २, नागभीड ५, सिंदेवाही २, मूल ९, सावली १, पोंभूर्णा ४, गोंडपिपरी २, राजुरा १६, चिमूर २, वरोरा ७, कोरपना १३, जिवती २ व इतर ठिकाणच्या २ रूग्णांचा समावेश आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील सिद्धार्थनगर येथील ४९ वर्षीय पुरूष, पद्मापूर येथील ५३ वर्षीय महिला, नरेंद्र नगर वार्ड येथील ६० वर्षीय पुरूष, बल्लारपूर तालुक्यातील ६७ वर्षीय पुरूष, भद्रावती तालुक्यातील किल्ला वार्ड येथील ५८ वर्षीय पुरूष, वरोरा तालुक्यातील २७ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय पुरूष, मूल तालुक्यातील ५३ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील किशोर नगर येथील ४५ वर्षीय पुरूष, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ७५ वर्षीय पुरूष तर गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगाव येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.