३५७ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:57 PM2018-12-09T23:57:01+5:302018-12-09T23:57:29+5:30

जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३५७ प्रकरणाचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला. यामध्ये न्यायालयीन प्रलंबित १५३ प्रकरणे व दाखलपूर्व २०४ प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी एक कोटीहून अधिक मूल्याच्या वादांबाबत तडजोड झाली.

357 settlement of cases | ३५७ प्रकरणांचा निपटारा

३५७ प्रकरणांचा निपटारा

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालत : आर्थिक मूल्यांच्या वादांबाबत तडजोड

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३५७ प्रकरणाचा एकाच दिवशी निपटारा करण्यात आला. यामध्ये न्यायालयीन प्रलंबित १५३ प्रकरणे व दाखलपूर्व २०४ प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान यावेळी एक कोटीहून अधिक मूल्याच्या वादांबाबत तडजोड झाली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन आर. बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याआधीची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली. या लोकअदालतीमध्ये विविध बँका, विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, बीएसएनएल कंपनी यांचे पदाधिकारी आणि पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रतिसाद दिला.
आपले वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरिता त्यांनी आपसात चर्चा केली व सामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीने वाद मिळविले.

एक कोटी रुपयांचे वाद सुटले
लोक अदालतीमध्ये एक कोटी २३ लाख पाच हजार ८९९ रुपयांच्या रकमेच्या मूल्यांच्या वादाबाबत तडजोड झाली. यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन बोरकर यांनी मागदर्शन केले. लोक अदालतीमध्ये प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी. श्रीखंडे, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खोत, कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशी एस. झेड. खान, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. एल. सराफ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. आर. कुलकर्णी, एस. एस. कुलकर्णी,एन. व्ही. रणवीर यांनी पॅनल न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

Web Title: 357 settlement of cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.