चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण

By साईनाथ कुचनकार | Published: February 4, 2024 04:36 PM2024-02-04T16:36:58+5:302024-02-04T16:37:35+5:30

...यामध्ये ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून, ४८८ कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली.

4 thousand 909 houses closed in Chandrapur; 488 families refused to provide information; Completed survey of Maratha society and open category | चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण

चंद्रपुरातील ४ हजार ९०९ घरे बंद; ४८८ कुटुंबीयांचा माहिती देण्यास नकार; मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण पूर्ण

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले. यामध्ये ४ हजार ९०९ घरे बंद आढळली असून, ४८८ कुटुंबीयांनी सर्वेक्षणास नकार दिला. त्यामुळे शहरात ९३.२७ टक्के कुटुंबांची माहिती गोळा होऊ शकली.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर शहरातील २३ फेब्रुवारी २०२४ पासून मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारीला पूर्ण झाले. चंद्रपूर शहरातील ८० हजार ९५१ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ८७४ कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठून ३ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपूर मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या मास्टर ट्रेनरने महानगरपालिकेतील नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाबाबतचे प्रशिक्षण दिले होते.

सर्वेक्षणादरम्यान एकूण १६० ते १८२ प्रश्न विचारण्यात आले. मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्यात आली. सदर माहिती मूलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याचे समजल्यानंतर प्रगणकाने त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली नाही. ही कार्यवाही आयुक्त विपीन पालीवाल व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात करण्यात आली.

सर्वेक्षणाबाबत नागरिकांमध्ये शंका
३१ जानेवारीपर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. जी घरे बंद होती त्यांना कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट दिली होती. मात्र त्यातील काही घरे बंदच असलेली आढळली. त्याचप्रमाणे सर्वेक्षणास नकार देणाऱ्या कुटुंबांची कर्मचाऱ्यांनी पुन्हा भेट घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. सर्वेक्षणदरम्यान काही नागरिकांमध्ये या सर्वेक्षणाबाबत भीती व शंका - कुशंका असल्याचे जाणवल्याचेही महापालिकेने म्हटले आहे.
 

Web Title: 4 thousand 909 houses closed in Chandrapur; 488 families refused to provide information; Completed survey of Maratha society and open category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.