चंद्रपूर जिल्ह्यातील ४ आदिवासी विद्यार्थ्यांनी गाठले माऊंट एव्हरेस्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:50 PM2018-05-16T14:50:40+5:302018-05-16T14:51:02+5:30

 मिशन शौर्य या धाडसी उपक्रमाअंतर्गत अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले आहे.

4 tribal students of Chandrapur district reached Mount Everest! | चंद्रपूर जिल्ह्यातील ४ आदिवासी विद्यार्थ्यांनी गाठले माऊंट एव्हरेस्ट !

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ आदिवासी विद्यार्थ्यांनी गाठले माऊंट एव्हरेस्ट !

Next
ठळक मुद्देअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन 

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: मिशन शौर्य या धाडसी उपक्रमाअंतर्गत अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रमशाळांमधील १० आदिवासी विद्यार्थी महिनाभरापूर्वी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करण्यासाठी निघाले होते. यातील चार विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर गाठले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा देवाडा येथील उमाकांत मडावी, परमेश आले, मनिषा धुर्वे आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा जिवती येथील कवीदास काठमोडे या विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्हयाची मान अभिमानाने उंच केली आहे.
मिशन शौर्य हा उपक्रम आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून या विद्यार्थ्यांना अर्थमंत्री मुनगंटीवार आणि आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात हिरवी झेंडी दाखवत शुभेच्छा दिल्या. या १० विद्यार्थ्यांपैकी आणखी २ विद्यार्थी येत्या २ दिवसात माऊंट एव्हरेस्ट सर करतील. या धाडसी, शूर, देशभक्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Web Title: 4 tribal students of Chandrapur district reached Mount Everest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.