चंद्रपुरातील वार्डात लावल्या ४० सिंटेक्स टाक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:49 AM2019-05-30T00:49:54+5:302019-05-30T00:50:17+5:30
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठयासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खासगी विंधनविहीरी तथा इतर विहिरींची पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी खाली गेल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री यांनी निर्देश दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पाणीपुरवठयासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. यात चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये चंद्रपूर शहरातील भूगर्भातील पाणी पातळी अतिशय खालावल्यामुळे सार्वजनिक तसेच खासगी विंधनविहीरी तथा इतर विहिरींची पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी खाली गेल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत पालकमंत्री यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार उपाययोजना करून शहरात आतापर्यंत विविध ठिकाणी ४० सिंटेक्सच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या टाक्या पाणी टंचाईशी दोन हात करणाºया नागरिकांसाठी पुरेशा नाहीत. साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरात मनपाने आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
चंद्रपूर शहर हे देशात अधिक तापमान व प्रदूषित शहर म्हणून ओळखले जाते. शहर कारखाने, उद्योग व औष्णिक केंद्रांमुळे शहराचे तापमान ४६ ते ४७ डिग्री असल्याने शहरात पाण्याचा वापर इतर शहरांच्या तुलनेत अधिक प्रमाणात होतो. सातत्याने भूजल उपसा वाढल्याने भूगर्भातीला जलपातळी खालावली आहे. पाणीपुरवठा बाबतीत प्रशासन अतिशय गंभीरतेने काम करीत असून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच अनेक जागी पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. शहरातील ज्या भागात पाईपलाईन नाही तसेच अमृत योजनेचे काम सुरु आहे. तेथे पालिकेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी दिवसा व रात्रीही पाण्याच्या टाक्यांची पातळीवर लक्ष ठेवून असून शहरात कुठेही पाण्याचा त्रास होऊ नये याकरिता प्रयत्नरत आहेत. असे असले तरी शहर मोठे असल्याने या उपाययोजना तोकड्या पडत आहे. त्यामुळे अनेक वॉर्डातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाईपलाईन वारंवार क्षतिग्रस्त
सध्या संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट सुरु आहे. तापमानाच्या बाबतीत चंद्रपूर शहर रोज नवे उच्चांक गाठत आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून दरवर्षी चंद्रपूर शहराची नोंद होते. याचा परीणाम पाणी पातळीवर होत असून पाण्याचा उपसा सातत्याने होत असल्याने भूगभार्तील पाण्याची पातळी खालावित आहे. शहरातील पाईपलाईनला खोदकामाद्वारे वारंवार क्षतिग्रस्त केले जात असल्यानेही पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे. अशा परिस्थितीत शहरात सर्व ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा करणे हे एक मोठे आव्हान आहे. पालिका प्रशासन सातत्याने पाणीपुरवठयावर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता मनपा प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
हुडीया मोहल्ला-जलनगर रेल्वे स्टेशन जवळ, वडगाव प्रभाग ८-साईनगर गौरकार यांच्या घराजवळ, वडगाव प्रभाग ८-शिवनगर चौधरी यांच्या घराजवळ, हुडीया मोहल्ला-आंबेडकर भवन समाजकल्याण कार्यालय मागे, संजय कन्नाके यांच्या घराजवळ, वडगाव प्रभाग ८-शिवनगर नागपुरे यांच्या घराजवळ, वडगाव प्रभाग ८-शिवनगर वसंत विला व सिद्धी अपार्टमेंट, वडगाव प्रभाग ८-शिवनगर गुरुनुले यांच्या घराजवळ, वडगाव प्रभाग ८-साईनगर कुरेकर यांच्या घराजवळ, वडगाव प्रभाग ८-ज्ञानदीप अपार्टमेंट, वडगाव प्रभाग ८-साईनगर टोंगे यांच्या घराजवळ , वडगाव प्रभाग ८-लक्ष्मीनगर धनोजे कुणबी समाज भवन समोर, तुलसी नगर, वडगाव प्रभाग ८-लक्ष्मीनगर धनोजे कुणबी समाज भवन मागे राऊतचे घराजवळ, कोतवाली वॉर्ड-माता मंदिर बाजूला, जटपूरा प्रभाग ७- धन्नू महाराज यांच्या घराजवळ, नेताजी चौक शेडमाके सभागृह समोर, गव्हर्मेंट इंजिनीरिंग कॉलेज मागे बायपास रोड टॉवर टेकडी जवळ, समाधी वॉर्ड गोंड राजे वाड्याजवळ, गौतम नगर बुद्ध विहार जवळ, समाधी वॉर्ड काळाराम मंदिर रोड विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, तुलसी नगर, रमाबाई नगर अष्टभुजा वॉर्ड, बंगाली कॅम्प श्यामनगर हनुमान मंदिर जवळ , तुकूम अय्यप्पा मंदिर जवळ लुम्बिनी नगर बुद्ध विहार जवळ, जलनगर समाज भवन जवळ, जलनगर सपना टॉकीज मागे,तुकूम मदिना मस्जिद जवळ, गन्ज वॉर्ड रमेश कोटपेल्लीवार यांचे घराजवळ, बाबुपेठ धीवर मोहल्ला सवारी बंगल्या जवळ, विवेक नगर तुकडोजी महाराज मंदिर जवळ चव्हाण कॉलोनी, मेजरगेट समोर, सावरकर नगर दूध डेरी देशभ्रतार यांच्या घराजवळ, दादमहाल वॉर्ड दीपक मलिक यांच्या घराजवळ, प्रधान महाल कृष्ण अपार्टमेंट जवळ, संजय नगर, सम्राट अशोक बुद्ध विहार लुम्बिनी नगर, वडगाव कुणबी समाज भवन मागे या ४० टाक्या लावण्यात आल्या आहेत.