१०० दिवसात ४० हजार शोषखड्डे निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:32 AM2021-09-17T04:32:47+5:302021-09-17T04:32:47+5:30

लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम प्रभावीपणे साध्य करणे आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी ...

40,000 drainage pits will be constructed in 100 days | १०० दिवसात ४० हजार शोषखड्डे निर्माण करणार

१०० दिवसात ४० हजार शोषखड्डे निर्माण करणार

googlenewsNext

लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम प्रभावीपणे साध्य करणे आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी पंचायत समितीनिहाय ३ हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आले. यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हागणदारीमुक्तीची (ओडिएफ) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांच्या बांधकामासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंब निवडीसाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी. सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. अभियानाबाबत लोकांना माहिती देणे, सहभाग आणि कृतीत उतरविण्यासाठी गावस्तरावर सभा, गटचर्चेच्या माध्यमातून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करणेसाठी अभियान कालावधीमध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष, विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिकाप्रमाणे हागणदारीमुक्त शाश्वतता व शोषखड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी १५ वा वित्त आयोग, मनरेगा किवा स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे. याशिवाय गावस्तरावर श्रमदान व लोकसहभागाची मोहीम राबवून शोषखड्डे निर्माण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेठी यांनी केल्या.

बॉक्स

मोबाइल ॲप्लिकेशनमधून होणार नोंद

पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची (वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीबी २.० मोबाइल ॲप्लिकेशनमधून नोंद करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा यासाठी सर्व गटविकास आधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

Web Title: 40,000 drainage pits will be constructed in 100 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.