जिल्ह्यात ४०,९५१ विद्यार्थ्यांकडे नाही बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:46+5:302021-09-22T04:30:46+5:30

मूल : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नगदी स्वरूपात न देता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी)द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्याचा ...

40,951 students in the district do not have bank accounts | जिल्ह्यात ४०,९५१ विद्यार्थ्यांकडे नाही बँक खाते

जिल्ह्यात ४०,९५१ विद्यार्थ्यांकडे नाही बँक खाते

Next

मूल : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नगदी स्वरूपात न देता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी)द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी काळातील शालेय पोषण आहाराची रक्कम असो किंवा विविध प्रकारची शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात जमा केली जात असल्याने जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी शाळांना कळविले. असे असतानादेखील ४०,९५१ विद्यार्थ्यांकडे बँक खाते नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

त्यामुळे हे विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्च २०२० पासून शाळा बंदच आहेत. बंददरम्यानच्या काळातील शालेय पोषण आहारांतर्गत तांदूळ व कडधान्ये शाळामार्फतीने देण्यात आले. मात्र, मागील शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुटी कालावधीतील लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी सूचना शाळांना देण्यात आल्या. बँक खाते शालेय पोषण आहाराबरोबरच विविध मिळणाऱ्या शिष्यवृत्यांसाठी होणार असल्याने पालकांनादेखील फायदेशीर ठरले असते. हाच विचार करून बँक खाते उघडण्याच्या सूचना दिल्यानंतरही चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण १ लाख ६६ हजार १४३ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २४ हजार २५९ विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडले आहे. मात्र, आजही ४०,९५१ विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते. यात सर्वाधिक चंद्रपूर, राजुरा व जिवती तालुक्यांतील विद्यार्थी संख्या असल्याचे निदर्शनास येत आहे. आता शाळा बंद असल्याने शिक्षकांनाच कसरत करावी लागणार आहे.

बॉक्स

तालुकानिहाय खाते न उघडणारे विद्यार्थी

चंद्रपूर - ६४५५,

बल्लारपूर - १८७४

भद्रावती - ३२८९

वरोरा - २८०४

चिमूर - ९७४

नागभीड - २६४७

सिंदेवाही - २८१४

ब्रह्मपुरी - ३३९५

मूल - १०८३

सावली - २१६२

गोंडपिपरी - ९०७

पोंभूर्णा - १४३८

राजुरा - ५१५७

कोरपना - ४५३१

जिवती - ४२२१

Web Title: 40,951 students in the district do not have bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.