ब्रह्मपुरी क्षेत्र विकासासाठी ४३ कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:01 PM2018-10-22T23:01:44+5:302018-10-22T23:02:49+5:30
ब्रह्मपुरी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे आता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रही विकासाग्रणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे आता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रही विकासाग्रणी होणार आहे.
ब्रह्मपुरी क्षेत्राच्या विकासासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करून त्यादृष्टीने शासनासह प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व सतत पाठपुरवठा केला. त्यामुळे ४२ कोटी ७८ लाख ८१ हजार रुपयांच्या विविध विकासकामांना निधीसह प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ब्रह्मपुरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज इंग्रजकालीन इमारतीच्या काही खोल्यामध्ये सुरू होते. या खोल्या न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने अपुऱ्या आणि गैरसोयीच्या असल्याने ब्रह्मपुरी येथे न्यायालयाची स्वतंत्र इमारत व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून बार कॉन्सीलसह नागरिकांनीव्दारे केल्या जात आहे. तसेच बार कॉन्सिलचे शिष्टमंडळ आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असता त्यावेळेस आमदारांनी तीन वर्षाच्या आत न्यायालयाच्या स्वंतत्र इमारतीचे बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले आहे. याशिवाय सिंदेवाही येथील सर्व कार्यालये एकाच इमारतीत, एकाच परिसरात सुरू करण्यासाठी सिंदेवाही येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात आ. वडेट्टीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच १७ कोटी रूपयांच्या रस्ते देखभाल व दुरूस्ती कामांसाठी मान्यता मिळवून दिली आहे.