४४४ मामा तलाव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: August 27, 2014 11:23 PM2014-08-27T23:23:40+5:302014-08-27T23:23:40+5:30
धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल
चंद्रपूर : धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल ४४४ तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सावली तालुक्यातील सर्वाधिक १२३ मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.
यावर्षी अर्धाअधिक पावसाळा होऊनही पाहिजे त्या प्रमामात जलसाठा नाही. अनेक जलसाठे अर्धेही भरले नाही. अशावेळी भविष्यात पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे गावांतील प्रत्येक तलाव, विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील आहे ती पाण्याची पातळी टिकविणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात १६७८ माजी मालगुजारी तलाव आहे. या तलावाच्या भरोवशावर काही गावांमध्ये गुरांना पिण्यासाठी पाणी, सिंचन, मच्छीमारी, शिंगाडा पिक घेतल्या जाते. विशेष म्हणजे या तलावांमुळे गावातील पाण्याची पातळीही वाढते. मात्र या तलावापैकी तब्बल ४४४ तलावांची देखभाल दुरुस्ती झाली नसल्याने ते सध्यास्थितीत चिंताजनक स्थितीत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तलाव सिंदेवाही तालुक्यात आहे. विशेष म्हणजे सावली तालुक्यात सर्वाधिक तलाव दुर्लक्षीत आहे. या तालुक्यात २६१ माजी मालगुजारी तलाव आहे. यातील तब्बल १२३ तलाव सद्यास्थितीत सुस्थितीत नाही.त्यामुळे तताव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. (नगर प्रतिनिधी)