४५० खासगी दवाखाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:02 PM2018-07-28T23:02:30+5:302018-07-28T23:02:46+5:30
देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, डेंटल क्लिनीकसह जवळपास ४५० खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णांची काहीसी हेळसांड झाली.
ठळक मुद्देडॉक्टरांचे आंदोलन : केंद्र सरकारच्या विधेयकाला विरोध
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, डेंटल क्लिनीकसह जवळपास ४५० खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णांची काहीसी हेळसांड झाली.
केंद्र सरकारने मंजूर केलेला नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक गरिबांसाठी हानिकारक व असुविधाजनक आहे. यामुळे वैद्यकीय सेवा व वैद्यकीय शिक्षण अतिशय महाग व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. हे विधेयक तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करीत चंद्रपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) च्या सर्व पदाधिकारी, डॉक्टरांनी विधेयकाचा निषेध नोंदवत एक दिवसीय धिक्कार दिवस पाळला.
काम बंद आंदोलनामुळे शनिवारी सकाळी ६ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व खाजगी क्लिनिक व दवाखाने बंद होते. मात्र तातडीच्या सेवा तसेच रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या सेवा सुरू होत्या, असे इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत व सचिव डॉ. मंसूर चिनी यांनी सांगितले.
आयएमए सभागृहात निषेध आंदोलनाला डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. प्रमोद ठाकूर, डॉ. किरण देशपांडे, डॉ. विजय करमरकर, डॉ. मनिष मुंधडा, डॉ. अनिल माडुरवार, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. नगिना नायडू, डॉ. मनिषा वासाडे आदींचा सहभाग होता.