कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ४६ जनावरांची सुटका

By admin | Published: May 9, 2017 12:36 AM2017-05-09T00:36:15+5:302017-05-09T00:36:15+5:30

पडोली आणि भद्रावती येथे ट्रकमधून कत्तलखान्यात नेणाऱ्या ४६ जनावरांची सुटका करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

46 rescued persons escaped from slaughter house | कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ४६ जनावरांची सुटका

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ४६ जनावरांची सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस / भद्रावती : पडोली आणि भद्रावती येथे ट्रकमधून कत्तलखान्यात नेणाऱ्या ४६ जनावरांची सुटका करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
पडोली चौकात नागपूरकडून येणाऱ्या ट्रकची (क्र. एमएच ४० एके ५९४५) झडती घेतली असता त्यात २५ जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी तिघांना अटक केली असून जनावरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई आज सोमवारी करण्यात आली. सुखवंत सिंग गजनसिंग बाजवा, अरबाज अब्दुल हरबज गबार शेख रा. नागपूर अशी आरोपींची नावे आहेत.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी दोन ट्रकमधून जाणारी ४० जनावरे आणि त्यापूर्वी २० जनावरांची पडोली पोलिसांनी सुटका करून आरोपींना अटक केली होती.
दुसऱ्या घटनेत एका १२ चाकी ट्रकमध्ये कोंबून नेत असलेल्या २१ बैलांची सुटका करण्यात भद्रावती पोलिसांना यश आले. ही कारवाई रविवारी रात्री ११ वाजता गस्तीवर असताना करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालक मजींदरसिंग हरदीपसिंग राय, नहीम कुरेशी रहिम कुरेशी, अफ्रीज अब्दुल व ट्रक मालक अजमेरसिंग गिल सर्व रा. नागपूर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ५(१), ५(ब), ९, ११ महराष्ट्र संरक्षण अधिनियम २०१५ तसेच सहकलम ११(१)(ड) भारताचा प्राण्यास निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आली. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्यासह पोलीस ताफ्याने केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये हे गस्तीवर असताना त्यांना खबऱ्यामार्फत पोलीस नियंत्रण कंक्षामार्फत मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 46 rescued persons escaped from slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.