मुल व बल्लारपूर तालुक्यात ४५ कोटींचे सात गेटेड साठवण बंधारे मंजूर;

By राजेश भोजेकर | Published: May 17, 2023 10:58 AM2023-05-17T10:58:45+5:302023-05-17T12:31:20+5:30

शेतकऱ्यांना मिळणार सिंचन सुविधा - सुधीर मुनगंटीवार

48 crore seven gated storage dams approved in Mul and Ballarpur talukas; | मुल व बल्लारपूर तालुक्यात ४५ कोटींचे सात गेटेड साठवण बंधारे मंजूर;

मुल व बल्लारपूर तालुक्यात ४५ कोटींचे सात गेटेड साठवण बंधारे मंजूर;

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुल व बल्लारपूर तालुक्यातील एकूण ०७ गेटेड साठवण बंधारे योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून, या योजनासाठी एकूण ४५ कोटी २४ लक्ष ८१ हजार सहाशे एक्कावन रुपये प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे.

० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल व बल्लारपूर तालुक्यात एकूण ०७ गेटेड साठवण बंधारे योजनांच्या,मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसुचीवर आधारीत कामाप्रित्यर्थ रु.४१,७८,७४८५३ रुपये व अनुषंगिक खर्च ३४,६०,६७९८ रुपये अशा एकूण अंदाजित ४५ कोटी २४ लक्ष ८१ हजार सहाशे एक्कावन रुपये किंमतीस प्रशासकीय मान्यता करण्यात आलेली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या गेटेड साठवण बंधारे योजनांमध्ये मुल तालुक्यातील चितेगाव क्रमांक 1, सुशिदाबगाव, आकापूर क्रमांक 1, ताडाळा व नलेश्वर तसेच बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव क्रमांक-१-कोठारी व पळसगाव क्रमांक-२-कोठारी या सात योजनांचा समावेश आहे. या योजनांची एकूण साठवण  क्षमता ३५६३ स.घ.मी. असून त्यातून १४१३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

या आधीही ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन विषयक महत्‍वपूर्ण प्रकल्‍प व योजना राबविल्‍या आहे. प्रामुख्‍याने बल्‍लारपूर तालुक्‍यात १० गावांना सिंचनाची सोय उपलब्‍ध करणारी पळसगांव-आमडी उपसा सिंचन योजना, चिचडोह बॅरेज, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये पाईपलाईन द्वारे सिंचनाची सुविधा, नलेश्‍वर मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या मुख्‍य कालव्‍याचे अस्‍तरीकरण, भसबोरण लघु प्रकल्‍पाच्‍या विशेष दुरूस्‍तीचे काम, पिपरीदिक्षीत लघु प्रकल्‍प विशेष दुरूस्‍तीचे काम, जानाळा लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती, राजोली येथे माजी मालगुजारी तलावाची विशेष दुरूस्‍ती, मौलझरी लघु प्रकल्‍पाची विशेष दुरूस्‍ती, मुल येथील माजी मालगुजारी तलावाच्‍या कालडोह पुरक कालव्‍याची विशेष दुरूस्‍ती, जामखुर्द उपसा सिंचन योजनेची विशेष दुरूस्‍ती, मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील शेतक-यांसाठी विशेष बाब या सदराखाली सिंचन विहीरी मंजूर, मुल, चिरोली, दाबगांव, गोलाभुज, राजोली, टेकाडी, डोंगरगांव आदी गावांमधील माजी मालगुजारी तलावाच्‍या विशेष दुरूस्‍तीची कामे आदी सिंचन विषयक कामे पूर्णत्‍वास आणली आहे.

मुल व बल्लारपूर तालुक्यात गेटेड बंधारे मंजूर झाल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नातुन पुन्‍हा एकदा शेतक-यांना सिंचन सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

Web Title: 48 crore seven gated storage dams approved in Mul and Ballarpur talukas;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.