५ जणांचा मृत्यू, १७७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:59+5:302021-06-04T04:21:59+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासामध्ये ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून १७७ नवे कोरोना बाधित आढळून आले ...

5 killed, 177 positive | ५ जणांचा मृत्यू, १७७ पॉझिटिव्ह

५ जणांचा मृत्यू, १७७ पॉझिटिव्ह

googlenewsNext

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासामध्ये ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून १७७ नवे कोरोना बाधित आढळून आले आहे. तर ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्याना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, १ हजार ९४५ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

गुरुवारी २ हजार ७२३ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १७७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ५४, चंद्रपूर तालुका २१, बल्लारपूर २८, भद्रावती २७, ब्रम्हपुरी ३, नागभीड ०, सिंदेवाही ०, मूल ०९, सावली ०१, पोंभूर्णा ०१, गोंडपिपरी ०४, राजूरा ०८, चिमूर ०२, वरोरा ०५, कोरपना ०६, जिवती ०५ व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ४३ वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील नेताजी नगर येथील ५७ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील ४० वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील ५९ वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बाॅक्स

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८३ हजार २२८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७९ हजार ८१३ झाली आहे. सध्या १ हजार ९४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ७९ हजार १२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ९३ हजार ८९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ४७० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ३६१, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

Web Title: 5 killed, 177 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.