इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के शुल्क माफी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:25 AM2021-02-12T04:25:55+5:302021-02-12T04:25:55+5:30
शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन घुग्घुस : या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या चार नामांकित शाळा आहेत. कोरोनाच्या अस्मानी संकटात सापडल्याने अनेकांचा ...
शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन
घुग्घुस : या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या चार नामांकित शाळा आहेत. कोरोनाच्या अस्मानी संकटात सापडल्याने अनेकांचा रोजगार बुडाला, हाताला काम नसल्याने आपल्या पाल्याला शिकविण्याची इच्छा असताना आर्थिक परिस्थितीमुळे ते शिकवू शकत नाहीत. त्यामुळे दोन्ही शाळांनि विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफी द्यावी, अशी मागणी पालकांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षण अधिकारी,पालकमंत्री, आमदार व माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन केली.
कोरोनामध्ये कामगार मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले. हाताला काम नाही. त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झाली. आपल्या पाल्यांना शिकविण्याची इच्छा असली, तरी पैशाची टंचाई निर्माण झाली आहे. त्या नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेने शालेय फी माफ करावी, अशी विनंती शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शंकर सिद्धम, गोकुल एडुलवार, देवराज गडपेलीवार, श्रीनिवास लक्काकुला, प्रवीण बनपूरकर, डॉ. सुनील दुधे, बंडीवार, शारदा गोदशेलवार, सविता यार्दी, आम्रपाली काटकर, सविता मेदापे व पालकाची उपस्थिती होती.