५० ट्रकांना लावले जामर, तरी वाहने रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:28+5:302021-08-26T04:30:28+5:30

बल्लारपूर : रस्ते अडवून अनेक दिवसभर उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अशा वाहन चालकांकडून जामर लावून दंडही ...

50 trucks were jammed, but the vehicles were still on the road | ५० ट्रकांना लावले जामर, तरी वाहने रस्त्यावरच

५० ट्रकांना लावले जामर, तरी वाहने रस्त्यावरच

Next

बल्लारपूर : रस्ते अडवून अनेक दिवसभर उभ्या असलेल्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. अशा वाहन चालकांकडून जामर लावून दंडही वसूल करण्यात येतो. मात्र, आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी ५० वाहनांना जामर लावून दंड वसूल केला तरीसुद्धा ट्रक चालक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीची कोंडी करीत आहे. याशिवाय सरकारी डेपोच्या बाजूने दोन वर्षांपासून एक जीप बेवारस पडली आहे. या जीपचा मालक कोण आहे व ती तिथून हटविण्यात का येत नाही, हे अद्यापही कळू शकले नाही.

शहरात असे अनेक वाहने आहेत की जे २४ तास रस्त्याच्या बाजूने पडून राहतात. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मुख्य मार्गावर रस्त्याच्या बाजूने वाहन उभे करून वाहनमालक वाहतुकीची कोंडी करीत आहे. एवढेच नाही तर शहरात गल्लोगल्लीत वाहन मालक रस्त्याच्या बाजूला वाहने उभे ठेवून रहदारीला अडचण निर्माण करीत आहे. अशा वाहनावर कारवाई करणे गरजेचे आहे.

कोट

तीन महिन्यांपासून वाहतूक विभागातर्फे रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहनावर जामर लावून कारवाई करणे सुरू आहे व मार्ग मोकळा करण्यात येत आहे.

- उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर.

250821\jamer.jpg

चाकाला जॅमर लावलेला ट्रक

Web Title: 50 trucks were jammed, but the vehicles were still on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.