५०० एलईडी पथदिवे फुस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:10 PM2018-07-06T23:10:04+5:302018-07-06T23:10:32+5:30

शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

500 LED streetlight fuselage | ५०० एलईडी पथदिवे फुस्स

५०० एलईडी पथदिवे फुस्स

Next
ठळक मुद्देमहानगरात नाराजी : त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
महानगरपालिकेने शहरातील सर्वच प्रभागांमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या दिव्यांचा प्रकाश उत्तम असतो शिवाय वीज बीलही कमी येते. मनपाच्या सभेत हा विषय मांडल्यानंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी संमती प्रदान केली होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी एलईडी दिव्यांची खरेदी करण्यात आली. नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये हे पथदिवे लावण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खांबांवर पथदिवे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, काही प्रभागांतील सुमारे ५०० पथदिवे अचानक बंद झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशास्थितीत प्रभागात भरपूर उजेड देणारे पथदिवे सुरू ठेवणे गरजेचे आहे़ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे़ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाने अनेक योजना सुरू केल्या़ एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णयदेखील याच धोरणांचा परिपाक असल्याचे नागरिक सांगतात़ नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही नगरसेवकांनी एलईडी पथदिव्यांची समस्या मांडली. पावसाळ्यात पथदिवे बंद ठेवणे चुकीचे आहे़ विविध प्रभागातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
आता ‘त्या’ नगरसेवकांचेही दुर्लक्ष
मनपाने एलईडी पथदिवे लावल्यानंतर काही नगरसेवकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. प्रभागातील चौकामध्ये बॅनर लावून आपण किती जागरूक आहोत, याचेही दर्शन घडविले. विकास कामांची यादीही बॅनरवर झळकविली. परंतु, एलईडी पथदिवे बंद झाल्याने नगरसेवकांना आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत.

Web Title: 500 LED streetlight fuselage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.