५०० कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Published: September 18, 2016 12:52 AM2016-09-18T00:52:31+5:302016-09-18T00:52:31+5:30

वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल कंपनी बेलगाव या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांकडून कोळसा उत्खनन करुन घेतल्या जात आहे.

500 workers' suicide note | ५०० कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

५०० कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

Next

पत्रकार परिषद : कामगारांचा संप, खदानीचे कामकाज ठप्प
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल कंपनी बेलगाव या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांकडून कोळसा उत्खनन करुन घेतल्या जात आहे. त्या मोबदल्यात त्यांना दगड उत्खननाच्या शासकीय आदेशानुसार वेतन अदा केले जात आहे. कोळसा खदानीतील कोणतीही सुविधा कामगारांना देण्यात आलेली नाही. याविरोधात येथील कामगारांंनी १८ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत कामगारांनी दिला.
यावेळी सुनिल रविदास, जालीद्र पेंदूर, मनीष रामगडे, सचिन मुवे, मधुकर फुलझले, धनपाल काळे, भोजराज डांगे आदींची उपस्थिती होती.
वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे सनफ्लॅग आयरन अ‍ॅन्ड स्टिल नावाची कंपनी आहे. या कंपनीत अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. सदर कंपनीमध्ये कोळशाचे उत्खनन केले जाते. मात्र या कामगारांना दगड उत्खनन करणाऱ्या कामगारांच्या नियमानुसार वेतन दिले जाते. तसेच कामगारांना माईन्स अ‍ॅक्ट अंतर्गत देण्यात येणाऱ्या कोणत्याच सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे कामगारांना कोळसा खाणीच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे व त्यांना मिळणाऱ्या सुविधा देण्याची मागणी कामगारांनी व्यवस्थापनाकडे केली. जर मागण्या मंजूर झाल्या नाही, तर संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र व्यवस्थापन मंडळानी याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारांनी १६ आॅगस्टपासून संप पुकारला. आता एक महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा व्यवस्थापन मंडळाकडून कोणतीही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे १५ ते २० दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला. (नगर प्रतिनिधी)

अशा आहेत कामगाराच्या मागण्या
कामगाराच्या योग्यतेनूसार वेतन देण्यात यावे, माईन्स अ‍ॅक्ट १९५२ नूसार अंडरग्राऊंड अलाऊंस, क्वार्टर अलाउंस, वाहन प्रतिपुर्ती भत्ता देण्यात यावा, दिवाळी बोनसपासून वंचित कामगारांना बोनस देण्यात यावे, खदानमध्ये कार्यरत कामगारांना हॅन्डग्लोज, अ‍ॅप्रान, टेस्टर, सेप्टी बेल्ट, टिकास आदी साहित्य देण्याते यावे, अशा कामगारांच्या मागण्या असून त्या तात्काळ पूर्ण करण्याचीही मागणी आहे.

Web Title: 500 workers' suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.