Farmer Suicide : फास घट्ट! विदर्भात ऑगस्ट महिन्यात ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 11:18 AM2022-09-16T11:18:48+5:302022-09-16T11:20:49+5:30
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच
चंद्रपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी, अतिवृष्टी व दरवर्षी वाढते उत्पादन खर्च आदी कारणांमुळे विदर्भातशेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे पुढे आले. विदर्भात ऑगस्टमध्ये ५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
राज्यात २००७ ते २०१४ या कालावधीत २११, २०१५-२०१६ मध्ये ८५, २०१७-१८ मध्ये ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्या जानेवारी ते ऑगस्ट महिन्यातच झाल्या होत्या. २०१९ मध्ये ३८, २०२० मध्ये ४४ आणि २०२१ मध्ये २९ तर यंदाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली.
ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना विदर्भात या आत्महत्या झाल्या आहेत. यातील ५१ पैकी सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलीत. अन्य प्रकरणे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या आत्महत्या चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यातील आहेत.