५१ योग शिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:07+5:302021-06-24T04:20:07+5:30
चंद्रपूर : महानगर भाजपा तर्फे महानगरात विविध ११ ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५१ ...
चंद्रपूर : महानगर भाजपा तर्फे महानगरात विविध ११ ठिकाणी योग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ५१ योग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आयोजित या शिबिरामध्ये महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार,भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार यांच्या हस्ते ५१ योग शिक्षकांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र,शाल व श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला.
निर्माण नगर, गुरुदेव सेवा मंडळ राऊत लेआउट, हनुमान नगर, न्यू इंडिया कॉन्व्हेंट तुकुम, अग्रसेन भवन, अथर्व कॉलोनी, इंदिरा नगर,जोड देऊळ पठाणपुरा, अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम बाबूपेठ, राष्ट्रवादी नगर येथे योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या आयोजनात पतंजली योग सेवा समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग,गायत्री शक्तीपीठ, श्री माता निर्मला देवी मंडळ, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिबिराचे सहसंयोजक उपमहापौर राहुल पावडे यांच्यासह संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, दिनकरराव सोमलकर, विठ्ठल डुकरे, संदीप आगलावे, प्रशांत विघ्नेश्वर, मनोज सिंघवी, धनराज कोवे, बंडू गौरकार, चंदन पाल, रामकुमार अकापेलिवार आदींनी शिबिर यशस्वी केले.
बाॅक्स
यांचा झाला सत्कार
निळकंठ येरमे, बंडू पेंदाम, प्रतिभा पेंदाम, सुवर्णा लोखंडे, अरुणा शिरभैय्ये, रमेश ददगाळ, मुरलीधर शिरभैय्ये, भोलाराम सोनुले, वृषाली धर्मपुरीवार, ज्योती राऊत, देवराव बोबडे, बबन अनमूलवार, रामराव धारणे, वंदना संतोषवार,प्रतिभा टेकाडे, अपर्णा चिढे, ज्योती आस्कर, नीता धामनगे,विजय चिताडे, रमेश येगीनवार, राजेश होकम, दोनाडकर, मंदे,राजेंद्र गुंडावार, श्रीकांत बच्चूवार, रवींद्र मांदाडे, प्रवीण नक्षीने, लता चापले,चितवन चव्हाण,नसरीन शेख,डॉ शैलेंद्र शुक्ला,प्रशांत तुंगीडवार, अनुप शर्मा, स्मिता श्रीगडिवार, प्रदीप लोखंडे, राहुल वांढरे, पूनम झा, महेश कानपल्लीवार,नन्नावरे,स्मिता रेभनकर,वंदना भूषणवार,ज्योती मसराम,नसरीन परवीन शेख,सनसर परवीन शेख, मिलिंद गंपावार, प्रतीक्षा धकाते,रुपाली मल्लेलवार,चंद्रशेखर गंनुरवार, रमेश कासुलकर, किशोर लुनावत, रमेश काकडे, रामभाऊ ढगे, माधुरी वाकडे, आनंद वनकर, हेमलता पटले, रंजना कोहळे, जयश्री जिवतोडे या याेग शिक्षकांचा गौरव करण्यात आला.