बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ५२ लाखांचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 01:01 PM2024-08-06T13:01:39+5:302024-08-06T13:06:19+5:30

लेखा परीक्षणातून ठपका : सहव्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

52 lakhs misappropriation in non-agricultural cooperative credit institutions | बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ५२ लाखांचा गैरव्यवहार

52 lakhs misappropriation in non-agricultural cooperative credit institutions

लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव :
मूल तालुक्यातील राजोली व मूल येथील एल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ५२ लाखांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी सहव्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना सोमवारी (दि. ५) उघडकीस आली. सहव्यवस्थापक रवींद्र कोल्हटवार, लिपिक सुशील श्रीमंतवार व दैनिक अभिकर्ता यश कुमार लेनगुरे अशी आरोपींची नावे आहेत. लेखा परीक्षणातून गैरव्यवहार उघडकीस आल्याने ही कारवाई झाली. 


एल्गार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची राजोलीत मुख्य कार्यालय व मूल येथे शाखा सुरू झाली होती. भविष्यातील सुरक्षा म्हणून गुंतवणूकदारांनी दैनिक, आवर्ती, मुदत व बचतठेव अशा विविध योजनांमध्ये लाखोंची गुंतवणूक केली. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ग्राहकांनी गुंतवणूक केलेली रक्कम बनावट स्वाक्षरीद्वारे परस्पर वळविण्यात आली. दैनिक वसुलीचे ५१ लाख ७५ हजार ४२० रुपये व अन्य असा एकूण ५२ लाखांचा अपहार केल्याचे उपलेखा परीक्षक मनीष अमरसिंग जाधव यांच्या लेखा परीक्षणातन उघड झाले जाधव यांनी मूल पोलिसात तक्रार केली. त्यावरून सहव्यवस्थापक रवींद्र कोल्हटवार लिपिक सशील श्रीमंतवार व दैनिक अभिकर्ता यश कुमार लेनगुरे आदी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ४०९ ४२०. ४६७ ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास एपीआय अविनाश मेश्राम करीत आहेत


एक वर्षापासून पतसंस्था कुलूपबंद
एल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्था एक वर्षापासून कुलूपबंद आहे. संचालक मंडळाने सहायक निबंधकांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. त्या तक्रारीवरून सहायक निबंधकांनी पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले. यात ५२ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले.


ठेवीदार आर्थिक संकटात

  • पतसंस्थेचे खातेदार व ठेवीदारांना पैसे परत देण्यास टाळाटाळ होत असल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले. पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ठेवीदारांनी सर्वात आधी केला होता. मात्र, कारवाई झाली नाही.
  • अनेकांनी मोठ्या विश्वासाने पैसे गुंतवणूक केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. हे पैसे परत कधी मिळणार, याकडे ठेवीदारांच्या नजरा लागल्या आहेत.


थकबाकीदारांकडून होणार वसुली।
लेखा परीक्षकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २७ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल केला. पण ही बाब उघडकीस येऊ दिली गेली नाही. यामागचे कारण काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, थकीत कर्ज खातेदारांवर प्रशासकीय कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. कर्जधारकाकडील थकीत रक्कम वसूल करण्यात येईल.


"एल्गार बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तक्रारीवरून चौकशी पूर्ण झाली आहे. यामध्ये सहव्यवस्थापक, लिपिक व दैनिक अभिकर्ता दोषी आढळले. पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे."
- लक्ष्मीकांत वानखेडे, दुय्यम निबंधक, सहकारी संस्था, मूल
 

Web Title: 52 lakhs misappropriation in non-agricultural cooperative credit institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.