५२०१ युवक-युवतींना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:52 PM2018-10-29T22:52:34+5:302018-10-29T22:53:17+5:30

प्रचंड उत्साह व जिज्ञासेवर विश्वास ठेवणाºया सुमारे ४० हजार युवकांच्या उपस्थितीत बामणी येथील युथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. ३८ हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी पाच २०१ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. केवळ जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे पाच हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.

5201 youths get employment | ५२०१ युवक-युवतींना मिळाला रोजगार

५२०१ युवक-युवतींना मिळाला रोजगार

Next
ठळक मुद्देयुथ एम्पॉवरमेंट समिटचा समारोप : दुसऱ्या दिवशी १८ हजार विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रचंड उत्साह व जिज्ञासेवर विश्वास ठेवणाºया सुमारे ४० हजार युवकांच्या उपस्थितीत बामणी येथील युथ एम्पॉवरमेंट समिटचा सोमवारी समारोप झाला. ३८ हजार युवकांनी अवघ्या पाच दिवसात आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांच्यापैकी पाच २०१ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. केवळ जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमुळे पाच हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, फॉर्च्यून फाऊंडेशन आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे रविवारी रोजगार महामेळावा सुरू झाला होता.
दुसºया दिवशी नोंदणी केलेल्या १८ हजार पैकी दोन हजार ४२३ विद्यार्थ्यांना सोमवारी विविध कंपन्यांनी आपल्या आस्थापनांकरिता निवड केली. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशा ५३ प्रतिष्ठित कंपन्यांना या ठिकाणी आयोजकांनी पाचारण केले होते.
मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील कंपन्यांच्या आस्थापना बल्लारपूर येथे येऊन मुलांच्या मुलाखती घेतल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांसाठी ही सुरुवात होती तर अनेकांना यावेळी संधीची अपेक्षा होती.
३८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यापैकी पाच हजार विद्यार्र्थ्यांंना दोन दिवसात संधी भेटणे हीदेखील मोठी उपलब्धी ठरली. आजच्या निवडीमध्येदेखील मुलींची संख्या प्रचंड होती.
युवकांकडून विविध व्यवसायांची चौकशी
ग्रामीण भागातील गोंडपिंपरी, जिवती, कोरपना राजुरा, बल्लारपूर, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही अशा अनेक तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांनी या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागामार्फत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मुद्रा बँक लोन वितरण संदर्भात अनेक बँकांनी या ठिकाणी आपले स्टॉल लावले होते. या स्टॉलवर देखील मोठ्या प्रमाणात युवकांनी रोजगाराभिमुख विविध व्यवसायाची चौकशी केली.
१९० युवकांना मुद्रा कर्ज मंजूर
जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसात बामणी मैदानावरून 190 युवकांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिल्या गेले. या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेले दर्जेदार मार्गदर्शन हेदेखील युवकांसाठी एक पर्वणी ठरली. मेळाव्याचे दुसºया दिवशी मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मुलाखतीपूर्वी चाणक्य मंडळातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय सोमवार दिवसभरात विविध विषयांवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: 5201 youths get employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.