53 हजार 709 शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 05:00 AM2021-10-23T05:00:00+5:302021-10-23T05:00:39+5:30

सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९  कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२  ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण्यात आली.  विशिष्ट क्रमांकासह ५५ हजार ६३०  पात्र खाती प्राप्त झाली. त्यापैकी ५४ हजार ७४३० शेतकऱ्यांंचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२१ अखेर ५४ हजार ७३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले.

53 thousand 709 farmers are debt free | 53 हजार 709 शेतकरी कर्जमुक्त

53 हजार 709 शेतकरी कर्जमुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५३ हजार ७०९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३१४ कोटी ४४ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला. ९०० शेतकऱ्यांंनी आधार प्रमाणिकरण न केल्याने ही प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांंनी तातडीने कर्जमुक्त व्हावे, यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय जनजागृतीसाठी सरसावला आहे.
सहकार, पणन, व वस्त्रोद्योग विभागाच्या ७ डिसेंबर २०१९ च्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९  कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांंसाठी कर्जमुक्ती योजना सुरू झाली. चंद्रपूर जिल्ह्यात २२  ऑक्टोबर २०२१ अखेर पोर्टलवर ५९ हजार ३४१ खाती अपलोड करण्यात आली. 
विशिष्ट क्रमांकासह ५५ हजार ६३०  पात्र खाती प्राप्त झाली. त्यापैकी ५४ हजार ७४३० शेतकऱ्यांंचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले. त्यामुळे २२ ऑक्टोबर २०२१ अखेर ५४ हजार ७३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी ५३ हजार ७०९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. त्यांच्या बँक खात्यावर ३१४ कोटी ४४ लाख वर्ग करण्यात आले. मात्र,  ९०० शेतकऱ्यांंनी प्रमाणीकरण न केल्याने त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
 

 प्रमाणीकरणासाठी विशेष मोहीम
- १५ ऑक्टोबर २०२१ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरण व तक्रारींच्या निराकरणासाठी  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या बँक शाखा, विका, सेवा, आविका संस्था कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 

कुठे संपर्क साधावा ?

- लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणासोबत तालुका व जिल्हास्तरीय तक्रार निवारणासाठी तालुका सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा अग्रणी बँक, व्यवस्थापक चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर मध्यवती सहकारी बँक चंद्रपूर तसेच खाते असलेल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले.
 

 

Web Title: 53 thousand 709 farmers are debt free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.