नोटा बदलून देतो असे सांगत ५५ हजारांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:23 PM2020-11-15T22:23:15+5:302020-11-15T22:23:34+5:30
¯Chandrapur Crime News आपण तहसीलदाराचे पी.ए. आहोत अशी बतावणी करीत व नोटा बदलून देतो अशी थाप मारत एका भामट्याने बल्लारपूर येथील बेकरी व्यावसायिकाला ५५ हजारांचा गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आपण तहसीलदाराचे पी.ए. आहोत अशी बतावणी करीत व नोटा बदलून देतो अशी थाप मारत एका भामट्याने बल्लारपूर येथील बेकरी व्यावसायिकाला ५५ हजारांचा गंडा घातला.
एका युवकाने दुकानातील कामगाराच्या मोबाईलवरून फोन करून बेकरीच्या मालकाला मिठाईचा मोठा ऑर्डर दिला. विश्वासात घेत सांगितले की तहसीलदार साहेबांकडे दोन हजारांच्या नोटाचा बंडल आहे. तुम्ही पाचशेच्या नोटा घेऊन चला तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये दोन हजारांच्या नोटा देतो, असे म्हटले. दुकानदाराने ४५ हजार रुपयांचा ऑर्डर घेऊन ५५ हजार रुपये मालकाने आपल्या कामगाराजवळ दिले. हे दोघेही तहसील कार्यालयात गेले. तिथे गेल्यावर कामगार मुलाला तहसील गेटवरच उभे ठेवून त्याच्याकडून ५५ हजार रु घेऊन हा भामटा आत गेला आणि परतच आला नाही. बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने कामगाराने तहसिल कार्यलयात जाऊन विचारपूस केली असता तहसीलदारांनी अशी कोणतीच ऑर्डर दिली नसल्याचे कळले. बेंगलोर बेकरीच्या मालकाला फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.