गोसेखुर्दच्या उजवा कालवा क्षेत्रात ५६ पाणी वापर संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:51+5:302021-08-22T04:30:51+5:30

यावेळी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गोसेखुर्द उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता संदीप हासे, कार्यकारी अभियंता (धरण) रा. ...

56 Water Utilization Institutions in the right canal area of Gosekhurd | गोसेखुर्दच्या उजवा कालवा क्षेत्रात ५६ पाणी वापर संस्था

गोसेखुर्दच्या उजवा कालवा क्षेत्रात ५६ पाणी वापर संस्था

googlenewsNext

यावेळी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गोसेखुर्द उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता संदीप हासे, कार्यकारी अभियंता (धरण) रा. गो. शर्मा, कार्यकारी अभियंता (आसोलामेंढा) राजेश सोनवणे, कार्यकारी अभियंता (घोडाझरी) पृथ्वीराज फाळके, तहसीलदार विजय पवार, आदी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक असून, विनाकारण पाणी वाया जाता कामा नये. पाणी वाया जात असेल तर पाणी वाटप संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार विभागाला आहेत. सिंचनाची एकूण कामे, अपूर्ण कामांची यादी, खर्च झालेल्या व आवश्यक असलेल्या निधीबाबत एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पालकमंत्र्यांनी विश्रामगृहाच्या आवारात वृक्षारोपण केले. बैठकीला सहायक अभियंता जी. बा. मडावी, अ. अ. बिमोटे, उपअभियंता गि. भ. टिपले, गोसेखुर्द आसोलामेंढा कालवे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वि. क. अगडे, खेमराज तिडके, राजेश कांबळे उपस्थित होते. गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्याद्वारे आसोलामेंढा धरणाच्या मुख्य कालव्यात थेट पाणी सोडून आसोलामेंढा प्रकल्पाच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी देणे सुरू आहे. आसोलामेंढा धरणाची सिंचन क्षमता ५४८७९ हेक्टर आहे. यापैकी ३९५३७ हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मिती झाली. सिंचन क्षेत्र ४१५७५ हेक्टर आहे. सध्या २९९५२ हेक्टरवर सिंचन होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

Web Title: 56 Water Utilization Institutions in the right canal area of Gosekhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.