५६४ नवे रुग्ण, १४४९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:29 AM2021-05-18T04:29:40+5:302021-05-18T04:29:40+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७८ हजार १३९ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६७ हजार ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७८ हजार १३९ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६७ हजार ६७५ झाली आहे. सध्या ९ हजार १८९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार २१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ५५ हजार २३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२७५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ११८०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४२, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत: व कुटुंबांची काळजी घ्यावी, कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
सोमवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ५०, ५२, ५८, ६३ व ६५ वर्षीय पुरुष, ३० व ५५ वर्षीय महिला, पिंपळगाव येथील ५० वर्षीय महिला, दुर्गापूर येथील ७१ वर्षीय पुरुष, छोटा नागपूर येथील ५२ वर्षीय पुरुष, किटाळी येथील ५५ वर्षीय महिला, बल्लारपुरात संतोषी माता वार्ड येथील ६२ व ७५ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील ७२ वर्षीय पुरुष व ४५ वर्षीय महिला, मूल शहरातील वार्ड क्र. १५ येथील ७२ वर्षीय महिला, ६८ वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थ वार्ड येथील ६२ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील ८८ वर्षीय पुरुष, चिंचोली येथील ७५ वर्षीय पुरुष, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, तर झरीजामणी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र १८३
चंद्रपूर तालुका २२
बल्लारपूर ९०
भद्रावती ३३
ब्रह्मपुरी १५
नागभीड १२
सिंदेवाही १३
मूल २४
सावली ०७
पोंभूर्णा ०७
गोंडपिपरी २१
राजूरा ३१
चिमूर १७
वरोरा ३५,
कोरपना ४०
अन्य १४