दहा महिन्यात ५७ रूग्णांना डेंग्यूचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:13 PM2018-11-17T22:13:08+5:302018-11-17T22:13:23+5:30
तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.
तालुक्याबाहेर खासगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी ६७ डेंग्यू रक्तजल नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी एका रूग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत २१३ डेंग्यू रक्त तपासणी झाली. त्यात ५७ जणांना लागण झाल्याचे आढळून आले असून तीन रूग्ण दगावले आहे.
स्क्र ब टायफसच्या रूग्णांतही वाढ
वातावरणातील बदलामुळे यावर्षी किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे स्क्र ब टायफससारख्या नवीन आजारालाही समोर जावे लागले. याबाबतची माहिती खासगी रूग्णालयातून मिळत असली तरी त्याची नोंद मात्र शासन दरबारी नाही.
ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सध्या हागणदारीमुक्त गाव व स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व निर्मल करण्याचे हाती घेतले असले तरी ग्रामपंचायतच्या उदासीन धोरणामुळे योजनेचे तीनतेरा वाजत आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, स्क्रॅब टायफस यासारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. असे आजार नागरिकांना होऊ नये, यासाठी प्रत्येक गाव व परिसरासाठी काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरी त्याचा फायदा होताना दिसत नाही. आजही ग्रामीण भागात शौचालयाला उघड्यावरच बसताना दिसत आहे. ग्रामपंचायत नोटीस बजावून सांगत असतानासुद्धा नागरिक जुमानत नाही.