दिवाळीत बाजारात येण्यापूर्वीच ६ टन २१ किलो भेसळयुक्त तेल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:13 PM2024-10-29T14:13:16+5:302024-10-29T14:14:29+5:30

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : तीन टन ३३५ किलो रवा, भेसन अन् मैद्यातही भेसळ

6 tonnes 21 kg of adulterated oil seized before it hit the market on Diwali | दिवाळीत बाजारात येण्यापूर्वीच ६ टन २१ किलो भेसळयुक्त तेल जप्त

6 tonnes 21 kg of adulterated oil seized before it hit the market on Diwali

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
दिवाळीच्या तोंडावर भेसळयुक्त पदार्थ बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन सतर्क झाला असून, भरारी पथकाचे गठण केले आहे. मागील महिनाभरात या पथकाने खाद्य तेलासंदर्भातील तीन कारवाई करून तब्बल नऊ लाख ४९ हजार ६३ रुपयांचा सहा टन २१ किलो तेलाचा साठा तर रवा, मैदा, बेसनमध्ये भेसळ केल्यासंदर्भात दोन कारवाई करून चार लाख सहा हजार ६२२ रुपयांचा तीन टन ३३५ किलो रवा, मैदा, भेसनाचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे दूषित व भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


दिवाळीत प्रत्येक कुटुंबात पंच पक्वान्न बनविले जातात. त्यामुळे तेल, रवा, मैदा, बेसन, डालडा आदींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परिणामी जादा नफा कमविण्याच्या अनुषंगाने अनेक विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अन्न व औषध प्रशासन यावर लक्ष ठेऊन असते. सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या नेतृत्वातील चमूने जिल्ह्याभरातील संशयितांवर धाडसत्र राबवले आहे. मागील महिन्याभराचा विचार केल्यास भेसळयुक्त खाद्य तेलाच्या तीन कारवाया केल्या तर खाद्यपदार्थ मैदा, रवा, बेसन याच्या दोन कारवाया करून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अद्यापही सुरुच राहणार आहे. 


भरारी पथकाची भेसळ व दूषित पदार्थांवर नजर 

  • दिवाळीत मिठाई, पेढे, चकल्या, शंकरपाळे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु हॉटेल, स्वीट मार्ट मर्चेंट भेसळ करून जादा नफा कमविण्याचा प्रयल करतात. 
  • परंतु सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या नेतृत्वात अन्न व औषध विभागाची पथके गठित केली आहेत. ही पथके होणाऱ्या भेसळीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
  • संशयित नमुने घेऊन तपासणीला पाठवले जाणार आहेत. दोष आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.


"खाद्यपदार्थ, खाद्यतेलाच्या होणाऱ्या भेसळीकडे आमचे लक्ष आहे. आम्ही भरारी पथकही गठित केले आहे. हे पथक अचानक धाड टाकून संशयित नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठवणार आहेत. दोष आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. मागील महिनाभरात आम्ही तब्बल सहा टन २१ किलो खाद्य तेल तर तीन टन ३३५ किलो रवा, मैदा, बेसन जप्त केले आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे." 
- प्रवीण उमप, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर

Web Title: 6 tonnes 21 kg of adulterated oil seized before it hit the market on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.