नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीएसटीपीएस परिसरात ६० कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:46+5:302020-12-29T04:27:46+5:30

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील १० वर्षांच्या कालखंडात वन्यजीव सुरक्षा आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने दीर्घकालिन धोरण तयार प्रभावणीपणे अंमलबजावणीही ...

60 cameras in CSTPS area for security of citizens | नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीएसटीपीएस परिसरात ६० कॅमेरे

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीएसटीपीएस परिसरात ६० कॅमेरे

Next

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मागील १० वर्षांच्या कालखंडात वन्यजीव सुरक्षा आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीने दीर्घकालिन धोरण तयार प्रभावणीपणे अंमलबजावणीही झाले. वन्य प्राण्यांचा संचार असलेल्या सीएसटीपीएस परिसरात ६० कॅमेरेहीे लावण्यात आले. त्याद्वारे वन्य प्राण्यांच्या हालचालींची नोंद घेतली जात आहे.

जैवविविधतेत ताडोबा व्याघ्र प्रकल्प समृद्ध आहे. रॉयल बेंगॉल टायगर या वाघांच्या प्रजातीसाठी ताडोबाचे जंगल प्रसिद्ध आहे. राज्यातील सर्वाधिक वाघ याच प्रकल्पात आढळतात. बिबट, रानमांजरी, हरणे, बारहसिंगे, चितळ, गवे, रानडुक्कर, नीलगाय, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे, मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा व विविध प्रकारच्या घोरपडीही आढळतात. ताडोबा- व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळाले. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली. परंतु, मानव आणि वन्यजीव यामध्ये संघर्ष वाढला. हा संघर्ष ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात सुरू होता. काही दिवसांपासून चंद्रपूर, दूर्गापर, ऊर्जानगरलगतच्या वर्दळीच्या वसाहतींमध्ये वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केली.

सौरउर्जा लावलेली गावे

शांतीनगर, किटाळी, वढोली, पायली, विचोळी, कढोली, चांदसुर्ला, आंबोरा, पद्मापूर, छोटा नागपूर, विचोडा रयतवारी येथे सौरउर्जा पथदिवे लावण्याचे काम सुरू होणार आहे. पीक व पाळीव जनावरांच्या विमायोजना अधिक शेतकरीस्नेही व कार्यक्षम करण्यासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले. परिसरातील नागरिकांनी वाघ पाहिल्याची माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून खात्री करणे सुरू आहे. अशा व्यक्तींचे बयान नोंदवून शास्त्रशुद्ध अहवाल तयार केल्या जात आहे.

Web Title: 60 cameras in CSTPS area for security of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.