आंब्याच्या व्यवसायातून ६० लाखांची उलाढाल
By admin | Published: May 11, 2014 12:15 AM2014-05-11T00:15:04+5:302014-05-11T00:15:04+5:30
चंद्रपुरातील मंडी सध्या आंब्याच्या खमंग सुगंधाने दरवळली आहे. केवळ आंब्याचा खमंग सुवासच नव्हे तर, दररोज लाखो रूपये या मंडीतील गल्ल्यात खुळखुळायला
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
चंद्रपुरातील मंडी सध्या आंब्याच्या खमंग सुगंधाने दरवळली आहे. केवळ आंब्याचा खमंग सुवासच नव्हे तर, दररोज लाखो रूपये या मंडीतील गल्ल्यात खुळखुळायला लागल्याने आंब्याचा गोडवा आता या व्यवसायात रमलेल्यांच्याही संसारात मधाचे बोट बुडविणारा ठरला आहे. उन्हाळा आला की हमखास आठवण येते ती म्हणजे रसदार आंब्यांची ! पूर्वी आंबे खाण्यासाठी मामाच्या गावी किंवा आजोळी जाण्याची मजा काही वेगळीच असायची. पण काळाच्या ओघात मामाच्या गावची आमराई केव्हाचीच तुटली. त्यासोबत नात्यांचे रेशिमबंधही सैल होत चाललेत. असे असले तरी बाजारातून खरेदी केल्या जाणार्या आंब्यावर आणि त्याच्या रसावर ही नव्हाळी भागविण्याची सर्वांचीच धडपड सुरू आहे. चंद्रपूरच्या फळबाजारात सध्या आंब्याचीच चर्चा आहे. हल्ली गावरानी आंबे दुर्मिळ झाले असले तरी त्या ऐवजी नावही आठविणार नाहीत, अशा वेगवेगळ्या आंब्याच्या ‘व्हेरायटी’ सध्या खवैय्यांना खुणावत आहेत.