६०० जिल्हा परिषद शाळांना संगणक देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 01:56 AM2016-02-20T01:56:43+5:302016-02-20T01:56:43+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत ...
सुधीर मुनगंटीवार : राजुऱ्यात जिल्हास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन
राजुरा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६०० जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
राजुरा येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी आमदार एकनाथराव साळवे, आ. संजय धोटे, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, संजय गजपूरे, जिल्हा परिषद सभापती सरिता कुडे, पंचायत समितीच्या सभापती निर्मला कुळमेथे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, अल्का आत्राम, यशवंत ताडाम, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, उपविभागीय अधिकारी गोयल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिक्षकांच्या समस्या व विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शिक्षक अदालत आयोजित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ही शिक्षक अदालत शिक्षण संचालकांच्या स्तरावर घेण्यात येईल व त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनासुध्दा शिक्षक अदालतीसाठी आमंत्रीत करण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध जि.प. शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बालकांच्या स्पर्धेचा नागरिकांनीही आनंद घेतला. (शहर प्रतिनिधी)