गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
By राजेश भोजेकर | Published: November 20, 2024 09:39 AM2024-11-20T09:39:24+5:302024-11-20T09:39:58+5:30
निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.
चंद्रपूर : राजुरा विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६१ लाखांची रोकड लपवून ठेवली होती. काँग्रेसने तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला - पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे.
आयोगाची सतर्कता आणि निवडणुकीतील गैरप्रकार उघड
निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून ही मोठी कारवाई केली. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली आहे.