२४ ते २८ जानेवारीला गोंदेडा येथे ६१वा गुंफामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:01+5:302021-01-21T04:26:01+5:30

पळसगाव (पि) : येथून जवळच असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा गुंफा येथे ६१वा गुंफामहोत्सव ...

61st Cave Festival at Gondeda from 24th to 28th January | २४ ते २८ जानेवारीला गोंदेडा येथे ६१वा गुंफामहोत्सव

२४ ते २८ जानेवारीला गोंदेडा येथे ६१वा गुंफामहोत्सव

Next

पळसगाव (पि) : येथून जवळच असलेल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा गुंफा येथे ६१वा गुंफामहोत्सव दि. २४ ते २८ जानेवारी रोजी साजरा होत आहे. कोविड १९ची धार्मिक सण-उत्सवांवरील बंदी लक्षात घेता शासनाच्या कोरोना नियमावलीच्या अधीन राहून अगदी साध्या पद्धतीने मर्यादित गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दि. २४ पासून अगदी साध्या पद्धतीने ग्रामस्वच्छता करून सामुदायिक ध्यान, रामधून, ग्रामगीता वाचन, सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी आणि रात्रीला भजन हे कार्यक्रम दररोज होतील. दि. २८ला दुपारी ह.भ.प. काळे महाराज यांच्या हस्ते गोपाळकाला व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. अगदी सध्या पद्धतीत या कार्यक्रमांची सांगता होणार आहे.

या महोत्सवाला वंदनीय तुकडोजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि महाराजांच्या पदस्पर्शाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या महोत्सवाला हजेरी लावत होते. अनेक गावातील महाराजांच्या पालख्या येत होत्या. परंतु यावर्षी कुणीही गुरुदेव भक्तांनी पालखी आणू नये तसेच भजन मंडळींनीसुद्धा यावर्षी या महोत्सवात भाग घेऊ नये, असे आवाहन श्री गुरुदेव गुंफा समिती गोंदेडाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: 61st Cave Festival at Gondeda from 24th to 28th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.