१ हजार ४९५ रोहयो कामांवर ६२ हजार ४०८ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:50+5:302021-06-09T04:35:50+5:30

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला ...

62 thousand 408 laborers on 1 thousand 495 Rohyo works | १ हजार ४९५ रोहयो कामांवर ६२ हजार ४०८ मजूर

१ हजार ४९५ रोहयो कामांवर ६२ हजार ४०८ मजूर

Next

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार ४९५ कामांवर एकूण ६२ हजार ४०८ मजुरांची उपस्थिती आहे. मजुरांच्या उपस्थितीबाबत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. काम मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बाक्स

अशी सुरू आहेत कामे

वृक्षलागवड - २९१

जलसिंचन-०८

जमीन सुधारणा - १९

जल संधारण - ६७

पाणीसाठा नूतनीकरण - ५१

पूर नियंत्रणाची - २८

वैयक्तिक स्वरूप - ९६९

पांदण रस्ते ६१

एकूण १ हजार ४९५

बाॅक्स

१५ दिवसांत मजुरी बँकेत

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण मजुरांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने केल्याने व केलेल्या कामांची मजुरी १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण मजूर वर्गांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात नरेगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे मजुरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नरेगा विभागामार्फत फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सांगितले.

कोट

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कामांचा सेल्फ तयार करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी काेरोनाचे सर्व नियम पाळल्या जात आहेत. मास्क, सामाजिक अंतर पाळणे व सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुणे इत्यादी नियमांचे पालन केले जात आहे. पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नरेगाच्या कामावर जिल्ह्यात ठिकठिकाणी अँटिजन टेस्ट शिबिरही घेण्यात येणार आहे.

-राहुल कर्डिले,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., चंद्रपूर

०००००

३८.१५ टक्के उदिष्ट

चालू आर्थिक वर्षात एकूण ३ लक्ष १० हजार ८०७ मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शासनाकडून प्राप्त झालेले मनुष्य दिन निर्मितीचे चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट ३८.१५ लक्ष असून ते १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीच्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सतत राबविल्या जात आहे.

कोट

रोजगार हमी योजनेच्या कामामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे. गावात काही दिवसांपूर्वी कामे सुरू होती. आता पुन्हा ही कामे सुरू होणार असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

-राकेश हिंगाने

सरपंच, कढोली बु.

Web Title: 62 thousand 408 laborers on 1 thousand 495 Rohyo works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.