६८ लाखांचा दारूसाठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:29 AM2019-03-15T00:29:22+5:302019-03-15T00:30:08+5:30
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा येथील एका गोडावूनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रामनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने धाड टाकून तब्बल ६८ लाख रुपयांची दारु पकडली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी कारवाई मानली जात आहे.
याप्रकरणी स्वप्नील शेंडे याला अटक करण्यात आली असून गोडाऊन मालक शुभम जैस्वाल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाऱ्या केल्याने दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोहारा येथील एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा लपवून ठेवल्याची माहिती एसडीपीओ शिलवंत नांदेडकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या पथकासह लोहारा येथे धाड टाकली. यामध्ये रॉयल्स चॉलेज २८७ पेट्टया, आर एस १४७ पेट्या, देशी दारुच्या ३८ अशा एकूण ६८ लाख रुपये किंमतीच्या ४६८ पेट्या दारु जप्त करुन एकाला अटक केली. तर गोडाऊन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसडीपीओ शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हाके, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दरेकर, पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, बल्लीक सुधीर पाटील, रामभाऊ राठोड, राकेश निमगडे, चिकाटे, भावना आदींनी केली.