डेंग्यूचे ६८, तर टायफाईडचे ७१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:47 PM2018-09-19T22:47:53+5:302018-09-19T22:48:08+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. हा सरकारी आकडा असून खासगी रूग्णालयात सुद्धा अनेक डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ४५० खाटांची संख्या असलेल्या या रूग्णालयात आज ७५५ रूग्ण भरती असल्याने एका खाटेवर दोन, तीन तर अनेक वॉर्डात रूग्ण जमिनीवर उपचार घेत आहे.

68 patients of dengue, 71 patients of typhoid | डेंग्यूचे ६८, तर टायफाईडचे ७१ रुग्ण

डेंग्यूचे ६८, तर टायफाईडचे ७१ रुग्ण

Next
ठळक मुद्देचंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय फुल्ल : एका खाटेवर दोन रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध साथीच्या आजाराच्या रूग्णांनी फुल्ल झाले आहेत. यामध्ये डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. हा सरकारी आकडा असून खासगी रूग्णालयात सुद्धा अनेक डेंग्यू पॉझिटिव्ह रूग्ण असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ४५० खाटांची संख्या असलेल्या या रूग्णालयात आज ७५५ रूग्ण भरती असल्याने एका खाटेवर दोन, तीन तर अनेक वॉर्डात रूग्ण जमिनीवर उपचार घेत आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीचे रोग, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या अनेक आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे गोरगरिब जनता वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. साथीच्या आजारामुळे ४५० खाटा असलेल्या रूग्णालयात ७५५ च्या वर रूग्ण भरती झाले असून एका खाटेवर दोन रूग्ण उपचार घेत आहे. तर अनेक रूग्ण जमिनीवर गादी टाकून उपचार घेत आहे. डेंगूने जिल्ह्यात पाय पसरले असून डेंग्यू सारख्या आजाराने तरूण अभियंता निखल बावीस्कर व अन्य एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर ९० च्यावर संशयित डेंग्यूच्या रूग्णांची नोंद घेण्यात आलेली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयात डेंग्यूचे ६८ रूग्ण पॉझिटिव्ह तर टायफाईडचे ७१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये जुलै मध्ये डेंग्यूचे ६ रूग्ण, आॅगस्टमध्ये ४१ रूग्ण तर १६ सप्टेंबर अखेर २१ रूग्ण पॉझिटिव्ह असे एकूण ६८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर टायफाईडमध्ये एप्रिलमध्ये ४, मे मध्ये ८, जून मध्ये ६, जुलै १४, आॅगस्ट १५, सप्टेंबर २४ असे एकूण ७१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. या सर्व रूग्णांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा आकडा सरकारी रूग्णालयातील असल्याने खाजगी रूग्णालयामध्ये सुद्धा डेंग्यू व टायफाईड रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे

Web Title: 68 patients of dengue, 71 patients of typhoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.