तीन कोळसा खाणीतून दररोज ७ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:03 PM2018-10-11T22:03:08+5:302018-10-11T22:03:28+5:30

जिल्ह्यातील सास्ती, पोवणी व बल्लारपूर या तीन कोळसा खाणीतून तीन ट्रेडर्स कंपन्या दररोज क्रश कोलच्या नावावर ए ग्रेडचा कोळसा उचलून सुमारे सात कोटींचा घोेटाळा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

7 crores scam every day from three coal mines | तीन कोळसा खाणीतून दररोज ७ कोटींचा घोटाळा

तीन कोळसा खाणीतून दररोज ७ कोटींचा घोटाळा

Next
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : सीबीआय चौकशी करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सास्ती, पोवणी व बल्लारपूर या तीन कोळसा खाणीतून तीन ट्रेडर्स कंपन्या दररोज क्रश कोलच्या नावावर ए ग्रेडचा कोळसा उचलून सुमारे सात कोटींचा घोेटाळा करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
सदर कोळसा खाणीतून डी ग्रेडच्या कोळशाचा लिलाव होते. या माध्यमातून तीन ट्रेडर्स कंपन्या हा कोळसा येथून नेतात. त्यांना हा कोळसा ज्यांना द्यायचा आहे. तो त्यांच्यापर्यंत थेट पोहचवायचा असतो. तो इतरत्र कुठेही साठवून ठेवता येत नाही.
मात्र सदर ट्रेडर्स कंपन्या डी ग्रेडऐवजी ए ग्रेडचा कोळसा उचलत आहे. हा कोळसा घुग्घुस मार्गावर साठवून ठेवला जातो. नंतर त्या कोळशाचे मिक्सिंग करून तो चढ्या भावाने विकला जातो.
हा सर्व प्रकार वेकालि अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.
या प्रकारामध्ये दरदिवसाला ५ ते ७ कोटींचा कोळसा घोटाळा होत असून याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चित्रा डांगे, शिवा राव, सुनिता अग्रवाल, राजेश अडूर यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणेदार सिरस्कर यांच्यावर कारवाई करा
बल्लारपूर येथून नुकतेच बदलून गेलेले ठाणेदार सिरस्कर यांनी आपल्या कार्यकाळात दारूविक्रेत्यांना अभय देत निरपराध व्यक्तीवर कारवाई केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सिरस्कर हे दारूविक्रेत्यांकडून महिन्याला ५० लाख रुपयांची माया जमवित होते, असा आरोप करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी सिरस्कर यांच्या संभाषणाची माहितीही पत्रकारासमक्ष ठेवली.

Web Title: 7 crores scam every day from three coal mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.