वादळामुळे ७० घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:36 PM2018-05-07T23:36:01+5:302018-05-07T23:36:01+5:30
कोरपना तालुक्यातील मांडवा व परिसराला रविवारी दुुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळाचा जबर तडाखा बसला. यात जवळपास ७० घरांचे अंशत नुकसान झाले. यात सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील मांडवा व परिसराला रविवारी दुुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळाचा जबर तडाखा बसला. यात जवळपास ७० घरांचे अंशत नुकसान झाले. यात सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रविवारी सकाळपासून कडाक्याची उन्ह होती. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. दुपारी ३.३० वाजता जोरदार वादळ सुटले. वादळामुळे गावातील घरांचे छप्पर, मांडव उडाले असून विद्युत खांबही वाकले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्णतव खंडित झाला आहे. वादळात मांडवा येथील गोसाई न्याहारे, घनश्याम कोराम, बंडू मरस्कोल्हे, दिलीप टेकाम, विठ्ठल राऊत, शत्रुघ्न सिडाम, महेंद्र डावरे, श्यामराव मरस्कोले आदींच्या घरांवरील छप्परांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजेश पिदूरकर यांच्या बैलालाही जबर मार बसला. बैलावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच कोरपन्याचे तहसीलदार हरिश गाडे यांनी रविवारीच आपादग्रस्त मांडवा या गावी भेट देऊन नुकसानीचे स्वत: पाहणी केली. आपदग्रस्तांना योग्य ती मदत पुरविण्याचे अधिकाºयांना निर्देश दिले. यावेळी मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी कमलवार, सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. या गावाला यापूर्वीही वादळाचा दोनदा तडाखा बसला होता, हे विशेष. आपादग्रस्तांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
प्रशासनातर्फे आपादग्रस्त गावाला योग्य ती मदत पुरविण्यात येत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. वादळातील नुकसानग्रस्त घरांचे सर्र्वेेक्षण करण्यात आले आहे.
- हरीश गाडे,
तहसीलदार, कोरपना.