जिल्ह्यात ७० टक्के रस्ते खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:06 AM2017-12-17T00:06:47+5:302017-12-17T00:08:27+5:30

शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्टÑ, अशी घोषणा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.

70 percent of the roads in the district are patch-free | जिल्ह्यात ७० टक्के रस्ते खड्डेमुक्त

जिल्ह्यात ७० टक्के रस्ते खड्डेमुक्त

googlenewsNext
ठळक मुद्देबांधकाम विभागाचा दावा : मात्र कामे निकृष्ट असल्याची ओरड

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र, अशी घोषणा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर पडलेले जवळजवळ ७० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. मात्र खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत निकृष्ट आणि थातूरमातूर झाल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहराला इतर गावांशी जोडणाºया रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. चंद्रपूर तालुक्यातील रस्त्यांवरील ९५ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल येरकडे यांनी दिली. चंद्रपूर तालुक्यातील रस्त्यावरी खड्डे बुजवण्यिाचे काम जवळपास पाच टक्के काम शिल्लक आहे. तेदेखील २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या कामाचे देयके अद्याप काढण्यात आलेले नाही. तरीही अंदाजे एक कोटींचा खर्च लागणार, असेही ते म्हणाले.
पोंभुर्णा तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग गोंडपिपरी ते मूल खेडी मार्गातील ५२ कि.मी. लांबी पैकी १३ कि.मी. पर्यंत पडलेले खड्डे बुजविण्यात आले. तर प्रमुख जिल्हा मार्ग ९७ कि.मी. लांब रस्त्यामधील ४१ कि.मी. पर्यंत खड्डे पडले. त्यापैकी ३६ कि.मी. खड्डे बुजविले. उर्वरित पाच कि.मी. चे खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे.
सिंदेवाही तालुक्यात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले. राज्य मार्गावरील खड्ड्याचे सिलिंग बाकी आहे. या कामासाठी बांधकाम विभागाकडे २० लाखांचा निधी असून आतापर्यंत पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च झाले.
राजुरा तालुक्यातील वरूर-विरूर (स्टेशन), विरूर-आर्वी, राजुरा - लक्कडकोट, राजुरा - गडचांदूर-हरदोना, चुनाळा ते अन्नुर या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मोजमाप झाले नाही. पवनी ते कवठाडा दुरुस्ती सुरू आहे. देवाडा-सोनापूर दुरुस्ती सुरू आहे. राजुरा - सास्ती या मार्गाची दुरुस्ती पुर्ण झाली आहे.
चिमूर येथील बांधकाम विभागाने संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा केला आहे. चिमूर तालुका राष्ट्रीय महामार्गावर आला असल्याने उमरेड, मिसी, चिमूर ते चिमूर-शेगाव-वरोरा हा मार्ग राष्ट्रीय मार्ग झाला आहे. बांधकाम विभागांतर्गत १७९ कि.मी. रस्त्यावरील ८५.४२ कि.मी. चे खड्डे बुजविण्यात आले आहे. राज्य मार्गावरील ४६.२५ कि.मी. पर्यंतचे संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले आहे.
नागभीड तालुक्यात खड्डेच खड्डे
नागाभीड - ब्रम्हपुरी या राष्ट्रीय महामार्गाचे फोर - वे चे काम सुरू असल्याने या मार्गाची दैनावस्था झाली आहे. येथे एकेरी वाहतूक सुरू रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. नागभीड - ब्रम्हपुरी हे २० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. तळोधी - बाळापूर आणि तळोधी - नेरी या राज्य महामार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शासनाची घोषणा नागभीड तालुक्यात पोहचली नाही, असे रस्त्यांची स्थिती बघून वाटते.
मूल तालुक्यात २४ लाखांचा निधी शिल्लक
मूल तालुक्यात खड्डे बुजविण्याचे अजूनही जवळजवळ ३५ टक्के काम शिल्लक आहे. संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मूल ते राजुली, मूल ते चामोर्शी, खेडी ते गोंडपिपरी व नांदगाव ते देवाळा या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती मूलचे उपविभागीय कार्यकारी अभियंता आर.एन. बोंदले यांनी दिली. यासाठी ५० लाख रुपये खर्च झाला असून उर्वरित २४ लाखांची कामे शिल्लक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
डांबरीकरणाच्या रस्त्यावर चुरीचे ठिगळ
जिवती तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र कामाची गुणवत्ता आणि कामे पाहिल्यास खड्डे बुजवूनही रस्त्यावर खड्डे बघायला मिळत आहे. अनेक डांबरी रस्त्यांवर तर चक्क चुरी टाकून खड्डे बुजविल्याचे दाखविण्यात येत आहे. तालुक्यातील सहा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाली होती. त्यापैकी चार कामे पुर्ण करण्यात आली व दोन कामे प्रगतीपथावर असल्याचे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.
ब्रह्मपुरी तालुक्यात सिलिंगची कामे शिल्लक
ब्रह्मपुरी : राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. मात्र खड्ड्यांवर सिलिंग होणे शिल्लक असल्याने निधी जैसे थे स्वरूपात आहे. राज्य मार्ग क्र. ३२२ तर २८.३० किमी वरील खड्डे बुजविले आहे. प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४ आदी मार्गावरील ८९ कि.मी. पर्यंतच्या खड्डयांवर डांबरीकरण केले असून सिलिंग बाकी आहे. त्यासाठी चालू वर्ष व पुढील वर्षासाठी एक कोटी ७० लाख रु. मंजूर झाले आहे.

Web Title: 70 percent of the roads in the district are patch-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.