जिल्ह्यातील ७१६ पाण्याचे स्त्रोत कोरडे
By admin | Published: June 4, 2014 11:40 PM2014-06-04T23:40:05+5:302014-06-04T23:40:05+5:30
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपैकी तब्बल ७१६ स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिण्याच्या पाण्याची तेवढी टंचाई भासली नसली तरी ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही तालुक्यात सर्वाधित पाण्याचे स्त्रोत आटले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहे. तरीही काही गावात आजही पाणीटंचाई आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण स्त्रोतांमधून सातशेच्या वर स्त्रोत आटले आहे. विशेष म्हणजे, जंगलव्याप्त असलेल्या सिंदेवाही तालुत्यात सर्वात स्त्रोत कोरडे पडले आहे. त्यानंतर पोंभूर्णा, राजुरा, गोंडपिपरी तालुक्यांच्या समावेश आहे. जिल्ह्यात अनेक गावांत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. काही गावातील योजना सुरु आहे. तर वीज बिल न भरलेल्या तब्बल ५0 च्यावर योजना बंद आहे. या योजना सुरु करण्यासाठी वीज मंडळाने सवलतीची योजना सुरु केली होती. तरीही ग्राम पंचायतीच्या उदासीन धोरणामुळे वीज बिल भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ५0 गावातील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.जिल्ह्यात तलाव, विहिर, बोढींची संख्या मोठय़ा संख्येने आहे. मात्र यातील गाळ नियमित काढण्यात येत नसल्याने अनेक पाण्याचे स्त्रोत कायमस्वरुपी बंद आहे.