कत्तलीसाठी जाणारी ७२ जनावरे पकडली
By admin | Published: September 27, 2016 12:45 AM2016-09-27T00:45:40+5:302016-09-27T00:45:40+5:30
गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी छुप्या मार्गाने जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी मोठ्या शहरात नेली जात आहेत.
गावकऱ्यांची सतर्कता : ४ ट्रक जप्त, चिमूर पोलिसांची कारवाई
चिमूर : गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरी छुप्या मार्गाने जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी मोठ्या शहरात नेली जात आहेत. नागभीडवरुन चार ट्रकमध्ये ७२ जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना खडसंगीवासीय नागरिकांच्या सतर्कतेने ट्रक पकडून चिमूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सोमवारी सकाळी ५ वाजता करण्यात आली.
गोहत्याबंदी कायदा असला तरी या कायद्याला बगल देत काही भागात आजही अवैधरित्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू आहे. नागभीड येथून चार ट्रकमध्ये ७२ जनावरे भरुन अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच खडसंगी येथील खडसंगी-कोरा-वरोरा मार्गावर नाकाबंदी करून जनावरे भरलेले चारही ट्रक पकडण्यात पोलिसांना यश आले.
चिमूर पोलीस खडसंगीपर्यंत येण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर ट्रक आडवा करून जनावरांना नेणाऱ्या वाहनाना अडविले. तेव्हापर्यंत पोलीस ताफा घेऊन पुुढील कारवाई केली. ट्रक एम.एच. २८ डी-८७८२, एम.एच. ०४- सीआर- ८१९३, एमएच ३१ सीक्यू- ७२४५ व एमएच २७ एक्स ६१३३ या क्रमांकाचे ट्रक जप्त करण्यात आले असून जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. चार ट्रकांची अंदाजे किंमत ४८ लाख तर जनावरांची किंमत अंदाजे ७ लाख ४० हजार असा ऐवज चिमूर पोलिसांनी जप्त केला. यामध्ये ट्रक डायव्हर हरिदास चौखे, मंगेश चन्नाने सिंदेवाही, कसीम खान मुस्तारविन खान व शफी शेख अब्दुल गफ्फार रा. नागभीड यांना अटक केली आहे.
ही कारवाई ठाणेदार दिनेश लबडे, मनोहर नाले, माकोडे, बोढे, सरोदे, बैठा व कैलाश वनकर यांनी केली. पकडलेल्या जनावरांना ग्रामपंचायत खडसंगी व बंदर (शिवापूर) येथील कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)