गांधी स्मारकासाठी ७५ वर्षीय शिक्षकाचा लढा

By admin | Published: October 15, 2016 01:01 AM2016-10-15T01:01:52+5:302016-10-15T01:01:52+5:30

सावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे.

75-year-old teacher's fight for Gandhi Memorial | गांधी स्मारकासाठी ७५ वर्षीय शिक्षकाचा लढा

गांधी स्मारकासाठी ७५ वर्षीय शिक्षकाचा लढा

Next

लोकप्रतिनिधींना निवेदन : गडचिरोली ते सावली पदयात्रा
प्रकाश लोनबले सावली
सावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे. त्यातीलच एक म्हणजे महात्मा गांधी यांनी सावली गावात दोनदा भेट दिली. तसेच गावात मुक्कामीसुदधा राहीले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिला गांधीग्राम म्हणून ओळखावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक सावलीत उभारण्यात यावे, यासाठी येथील ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर गाडेवार हे प्रयत्न करत आहेत. मात्र त्याच्या लढ्याला अजूनही यश आले नाही.
सावलीला गांधी ग्राम म्हणून ओळखण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार यांच्या नेतृत्वात दोन वर्षापूर्वी गडचिरोली ते सावली अशी पदयात्रा काढली. तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अहिर, खा. नेते यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र अजूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा गांधीग्राम बनविण्याचा व राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी लढा सुरु आहे.
म. गांधीची सावलीला प्रथम भेट १४ नोव्हेंबर १९३३ रोजी व द्वितीय भेट २७ फेब्रुवारी १९३६ साली झाली. या काळात सावलीत सुतकताई, सुतापासून खादीचे कपडे बनविण्याचा व्यवसाय सुरु होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी म. गांधीनी स्वदेशीचा वापर व विदेशी वस्तूचा त्याग हा मंत्र दिला होता. सावलीत खादीचे कापड तयार होत असल्याने ग्राम स्वराज्य कल्पनेप्रमाणेच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सावलीत नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने १९२७ ला खादी भांडार केंद्र सुरु झाले. त्यावेळी अवस्थी याच खादी भांडाराच्या पहिल्या व्यवस्थापक बनल्या. यावेळी खादी भांडारचे व्यवस्थापन, विपणन, उत्पादन, विक्री, याची माहिती गांधीजीना वेळोवेळी कळविली जात होती. यांची पाहणी करण्यासाठी व कामगारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी १४ नोव्हेंबर १९३३ ला गांधीजी सावलीत आले. यावेळी खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन निश्चित करण्यात आले.
खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन २६ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३६ पर्यंत चालले. डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनलाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशिला नायर आदी महान नेते उपस्थित होते. या काळातच पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पत्नी कमला नेहरु याचे निधन झाल्याने अधिवेशन समाप्त करण्यात आले. असा इतिहास सावलीला लाभला आहे. त्यामुळे सावलीला गांधीग्राम म्हणून ओळखण्यात यावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार व त्याचे सहकारी यांचा लढा सुरुच आहे.हा लढा यशस्वी होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: 75-year-old teacher's fight for Gandhi Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.